Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन केल्या महत्त्वपूर्ण घोषणा

9

Minister Chandrakant Patil Announcements : महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकिय अभियांत्रिकी महाविद्यालये (Government and Non-Government Engineering Colleges), औषध निर्माण शास्त्र महाविद्यालये (Colleges of Pharmaceuticals Manufacturing Technology) आणि सर्व तंत्र निकेतनांमध्ये (Polytechnics) ‘अद्ययावत उत्कृष्टता केंद्र-सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास परवानगी मिळाली असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

२८ जून २०२३ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

(वाचा : Before Confirming Your Admission: कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा )

‘नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगधंद्यांमधील त्याचा वापर वाढवत समन्वय साधणे आणि त्यातून नवीन रोजगार निर्मितीस चालना देणे हा या मागचा मूळ उद्देश असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मुंबईमधील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हि जे टी आय/ VJTI), पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, नागपुरचे शासकीय अभियांत्रिकी, छत्रपती संभाजीनगरचे शासकीय औषध निर्माण शास्त्र, कराडचे शासकीय औषध निर्माण शास्त्र, छत्रपती संभाजीनगरेच शासकीय अभियांत्रिकी, अमरावती आणि यवतमाळचे शासकीय अभियांत्रिकी, पुणे जिल्हयातील अवसरी येथील शासकीय अभियांत्रीकी व संशोधन महाविद्यालय आणि कोल्हापुरचे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी ही उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणारं असल्याची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली.

(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; ४३४४ पदांसाठी महाभरती )

उद्योग-धंद्यातील तज्ञ व नामांकित संस्थातील प्राध्यापकांची सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणारं असून, आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध ठिकाणी हि केंद्र उभारण्यासाठी साधारण ५३ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी उद्योग आणि संशोधन संस्थांकडून आर्थिक सहभाग देखील घेण्यात येईल. तीन वर्षांकरिता ही केंद्रे स्थापन करण्यात येणारं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सर ज. जी कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा:

मुंबईतील ज. जी कला महाविद्यालयाल, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचे मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या महाविद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम पाहता येथील शिक्षणाचा विकास करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून दि.१९ मार्च २०२० ला विद्यापीठ अनुदान आयोगास कला संचालनालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार इरादापत्र प्राप्त झाले असून, ज. जी कला महाविद्यालय देशातील पहिलेच अभिमत विद्यापीठ असणार आहे.

या विद्यापीठासाठी ५० कोटी ३७ लाख ९० हजार ८०० रुपयांच्या खर्चासदेखील या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

(वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात )

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.