Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनमध्येही आवाज येईना? ‘हे’ पाच उपाय येतील खूप कामाला

11

​व्हॉल्यूम स्लाइडरचा वापर करुन बघा

तर स्मार्टफोनमध्ये आवाज येत नसल्यास सर्वात सिंपल आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण स्मार्टफोनचा आवाज त्याच्या बटणांनी कमी जास्त आहे का? हे पाहू शकतो. तसचं आयफोनमध्ये किंवा बऱ्याच लेटेस्ट डिव्हाईसमध्ये असणारा स्मार्टफोनचा व्हॉल्यूम स्लाइडर वरच्या बाजूला सरकवून तुम्ही आवाज वाढवू किंवा कमी करु शकता.

​वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाऊन आवाज वाढवा

अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाऊन आवाज वाढवा

अनेक स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅप्लिकेशनमध्ये देखील व्हॉल्यूम सेटिंग्ज असतात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉल्यूम सेटिंग्ज शोधू शकता आणि आवाज वाढवू शकता. जसंकी VLC Player सारख्या व्हिडीओ प्लेअरमध्ये आवाजाचा ऑप्शन असतो, तो त्याठिकाणी जाऊन वाढवता येतो.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

इक्वेलायझर फीचर वापरा

इक्वेलायझर फीचर वापरा

आजकाल बऱ्याच फोनमध्ये हे फीचर असते. या इक्वेलायझर फीचरने तुम्हाला आवाज कमी जास्त करता येतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनमध्ये इक्वेलायझर असल्यास त्याचा वापर करून तुम्ही आवाजाचे वेगवेगळे पर्याय कमी जास्त करु शकता. उदाहरणार्थ बास, वोकल असे घटक वाढवू किंवा कमी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्पीकरचा आवाज नियंत्रित करू शकता.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

एक्सटर्नल स्पीकर्स वापरा

एक्सटर्नल स्पीकर्स वापरा

तुम्‍ही तुमच्‍या स्‍मार्टफोनच्‍या आवाजाने समाधानी नसाल, तर तुम्‍ही
एक्सटर्नल स्‍पीकर देखील वापरु शकता. हा स्पीकर वापरून अधिक मोठा आणि दमदार क्वॉलिटीचा आवाज तुम्ही मिळवू शकता. स्मार्टफोनशी हे एक्सटर्नल स्पीकर्स ब्लूटूथ किंवा वायपने कनेक्ट करून, तुम्ही उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ ऐकू शकता.
​वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​साउंड बूस्टर अ‍ॅप्स वापरा

​साउंड बूस्टर अ‍ॅप्स वापरा

काही स्मार्टफोन्ससाठी साउंड बूस्टर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला आवाजाची क्वॉलिटी वाढवण्यात आणि सुधारण्यात मदत करू शकतात. हे अ‍ॅप्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.