Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Tecno Camon 20 Pro 5G वर भन्नाट ऑफर, 256GB स्टोरेजचा फोन स्वस्तात विकतघेण्याची संधी

19

नवी दिल्ली : Tecno Camon 20 Pro 5G किंमत ऑफर: स्मार्टफोन कंपनी Tecno Mobile ने नुकत्याच लाँच केलेल्या Tecno Camon 20 Pro 5G स्मार्टफोनवर दमदार सूट जाहीर केली आहे. Tecno Camon 20 Pro 5G हा एक भारी कॅमेरा असणारा फोन आहे. दरम्यान Tecno चा स्मार्टफोन ३० जून २०२३ पर्यंत मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत स्वस्तात उपलब्ध करून दिला जाणार आहे. फोनवर थेट २००० रुपयांचं डिस्काउंट दिलं जात आहे. फोनचा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट सवलतीत खरेदी करता येणार आहे.

Tecno Camon 20 Pro 5G वर किती सूट?

वर सांगितल्याप्रमाणे, TECNO CAMON 20 PRO मर्यादित वेळेत सवलतीत मिळू शकतो. वापरकर्ते कोणत्याही बँक कार्डद्वारे पेमेंट करुन थेट २००० रुपयांची सवलत मिळवू शकतात. किंमतीचं म्हणाल तर टेक्नो स्मार्टफोनचा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट १९,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. डिस्काउंटनंतर हा फोन १७,९९९ रुपयांना घेता येईल. त्याच वेळी, २१,९९९ रुपयांऐवजी १९,९९९ रुपयांमध्ये २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळवण्याची संधी आहे. हा फोन डार्क वेल्किन आणि सेरेनिटी ब्लू कलर व्हेरियंटमध्ये येतो. हँडसेट केवळ Amazon India वरून खरेदी करता येईल.

Tecno Camon 20 Pro 5G चे फीचर्स

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचं झालं तर Techno Camon 20 Pro 5G स्मार्टफोन मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर मध्यभागी एक पंच-होल आहे आणि डिस्प्ले फुलएचडी+ रिझोल्यूशन देते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा RGBW सेन्सर आहे जो OIS सपोर्टसह येतो. 108MP अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो सेन्सर्स व्यतिरिक्त, हँडसेटमध्ये २ मेगापिक्सेल बोकेह लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. फोनला पावर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा : Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनमध्येही आवाज येईना? ‘हे’ पाच उपाय येतील खूप कामाला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.