Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदवी आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवार, २८ जून २०२३ ला जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीतही नामांकित कॉलेजांमधील कला, वाणिज्य आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना अधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले.
(वाचा : Chandrakant Patil Announcement : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन केल्या महत्त्वपूर्ण घोषणा)
पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश यादीत बी.कॉम आणि बीएमएस अभ्यासक्रमाच्या कट ऑफमध्ये फारशी घट झाली नाही. मात्र, अनेक नामांकित कॉलेजांमधील बीएससीच्या कट ऑफमध्ये कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या गुणवत्ता यादीतही अंशतः फरक असल्यामुळे दुसऱ्या यादीच कट ऑफही वरच्या पातळीवर राहिला आहे. त्यामुळे आपल्या पसंतीच्या आणि नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी अनेकांची या फेरीनंतरही हुकली आहे. यामुळे नामांकित कॉलेजांमध्ये पुढील फेरीसाठी चुरस असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, यंदा कला शाखेच्या पहिल्या यादीच्या कट ऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १ ते ४ टक्कयांनी वाढ झाली होती. तर वाणिज्य शाखा, बीएसएस आणि बॅफ सारख्या सेल्फ फायनान्स कोर्सेसनाही प्रवेशासाठी चुरस असून, कट ऑफमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ ते ४ टक्क्यांऐ वाढ झाली आहे.
(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; ४३४४ पदांसाठी महाभरती)
महत्त्वाचे :
- दुसऱ्या गुणवत्ता यादीतून कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० जून ते ५ जुलै २०२३ या कालावधीत ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्याची मुभा आहे.
- पदवी प्रवेशही तिसरी गुणवत्ता यादवी ६ जुलैला प्रसिद्ध केली जाईल.
- तिसऱ्या गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ७ जुलै ते १० जुलै २०२३ या वेळेत विहित कॉलेजांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चितकरता येईल.
(वाचा : Online Career Opportunities: वर्क फ्रॉम होमसाठी ‘व्हर्चुअल वर्ल्ड’ मधील पर्याय, कोणत्या क्षेत्रात मिळवाल संधी)