Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Delta Plus Variant In Kolhapur: डेल्टा प्लसने वाढवली कोल्हापूरची चिंता; रुग्णसंख्या घटत असतानाच…

14

हायलाइट्स:

  • कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचा विळखा सैल.
  • डेल्टा प्लसचे रुग्ण आढळू लागल्याने चिंतेत भर.
  • स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज.

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचा विळखा सैल होत असला तरी अजूनही रोज तीनशे ते चारशे नवे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येने दोन लाखाचा तर कोल्हापूर शहरात पन्नास हजाराचा टप्पा पार केला आहे. एकीकडे करोनाचा विळखा असतानाच जिल्ह्यात सात रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून आत्तापर्यंत दहा लाखांवर लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ( Delta Plus Variant In Kolhapur Updates )

वाचा: मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या संसर्गाचा कहरच झाला. वर्षअखेरीस बाधितांचा आकडा चाळीस हजारावर पोहचला. पुढे दिवाळीनंतर विळखा सैल झाला. पुन्हा यावर्षी मार्चपासून रुग्ण सापडू लागले. त्यानंतर मेपासून पुन्हा करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. राज्यात सर्वाधिक रुग्ण कोल्हापुरात सापडू लागले. रोज दोन हजारावर बाधित आढळू लागल्याने आणि मृतांचा आकडाही रोज चाळीसवर गेल्याने परिस्थिती चिंताजनक झाली.

वाचा: महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य

गेले पंधरा दिवस जिल्ह्यात करोनाचा कहर काहीसा कमी झाला असला तरी अजूनही रोज तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा दोन लाखावर गेला. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख एक हजार ४७४ बाधित रुग्णांपैकी १ लाख ९३ हजार ५८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ७८४ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात ५ हजार ६३२ जणांचा जिल्ह्यात करोनाने बळी घेतला आहे. करोनाची ही चिंताजनक परिस्थिती असताना दोन दिवसात डेल्टा प्लसने डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेमध्ये डेल्टा प्लसची लक्षणे आढळली तर रविवारी आणखी सात जणांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात भीती कायम आहे. प्रशासन स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.

आजची करोना स्थिती

आजचे रुग्ण- १८३
बरे झालेले रुग्ण- ४४३
आज मृत्यू- ९
सक्रिय रुग्ण- २७८४

वाचा:शरद पवारांना ‘ते’ चांगलं माहीत आहे!; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.