Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तर या फोनची मूळ किंमत ही ६६,९९९ रुपये असून सेलमधील डिस्काउंटनंतर फोनची किंमत ५९,९९९ रुपये इतकी होणार आहे. कंपनी थेट ५ हजारांपर्यंत बँक ऑफर्सचं डिस्काउंट देखील देत आहे. तसंच एक्सचेंज ऑफर्समध्ये थेट २९,६५० रुपयांपर्यंत वाचवता येतील. पण इतकं मोठं डिस्काउंट मिळवण्यासाठी जुन्या फोनची कंडीशन आणि मॉडेलही चांगलं असावं लागणार आहे. तर हे सारे डिस्काउंट वापरल्यास तुम्ही हा फोन थेट निम्म्या किंमतीतही मिळवू शकणार आहात.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
वनप्लसच्या या फोनमध्ये रॅम १२ जीबी देण्यात आला आहे. तसंच याची इंटरनल स्टोरेज २५६ जीबी इतकं असणार आहे. हा फोन 5G एनाबेल्ड असणार असून याचा प्रोसेसरही दमदार आहे. प्रोसेसर म्हणाल तर Snapdragon 8 Gen 1 चिपसेट हा असणार आहे. याचं स्क्रिन रेझ्योलेशन 3216X1440 पिक्सल असणार असून ६.७ इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आलं आहे. फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असून एक ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि ८ मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्सही आहे. सेल्फीसाटी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसंच हा फोन अँन्ड्रॉईड 12 वर चालत असून Oxygen OS वर काम करतो.
वाचा : Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनमध्येही आवाज येईना? ‘हे’ पाच उपाय येतील खूप कामाला