Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तर Llyod कंपनीचा बेसिक व्हर्जन हा 32WS550E हा एचडी रेडी वेबओएस हा टीव्ही असून हा ज्यांना कॉम्पॅक्ट ऑप्शन हवा आहे त्यांच्यासाठी आहे. या टीव्हीमध्येही प्रमुख ओटीटी अॅप्स सपोर्टेड आहे. तसंच ऑडियोमध्ये डॉल्बी ऑडिओ दिला गेला आहे. याशिवाय पुढील व्हर्जनमध्ये QS8503 QLED टीव्ही 4k QLED डिल्प्लेसह येतो. यामध्ये ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच हे ऑप्शन मिळणार आहेत. यांचं रेझोल्युशन 3840X2160 पिक्सल असणार असून 20W स्पीकरसह डॉल्बी ऑडिओ दिला जाणार आहे. या टीव्हींमध्ये मोशन एस्टीमेशन, मोशन कंपंसेशन आणि एएलएम टेक्नीक हे खास फीचर्सही आहेत. तसंच टीव्हीसोबत येणारा मॅजिक रिमोट वापरण्यासाठी अगदी सिंपल असून अधिक चांगल्यारित्या टीव्हीला कंट्रोल करण्यास मदत करतो.
वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा
Llyod टीव्हींच्या किंमतीचं काय?
तर Llyod QS850E QLED टीव्ही तीन वेगवेगळ्या साईजमध्ये असल्याने त्याची किंमतही वेगवेगळी आहे. यामध्ये ४३ इंचाचा मॉडेल २९,९९९ रुपये असेल तर ५० इंच मॉडेल ३९,९९९ रुपये असणार आहे. ५५ इंचाचा मॉडेल ४४,९९० रुपये असेल. याशिवाय 32WS550E HD Ready TV ची किंमत १३,९९९ रुपये असणार आहे. हे सर्व टीव्ही फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स