Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Redmi 11 Prime हा अनेकप्रकारे भारी आहे. कारण यामध्ये युजर्सना रॅम बुस्टर फीचर दिलं आहे. ज्याच्या मदतीने रॅम ८ जीबी पर्यंत वाढवता येईल. फोनला भारी रिफ्रेश रेट आणि एक वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. या फोनचा UFS 2.0 स्टोरेज असून इतर फीचर्सचं म्हणाल तर याचा मूळ रॅम हा ४ जीबी आहे. तसंच ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिलं गेलं आहे. याची मूळ किंमत १४,९९९ रुपये असून फ्लिपकार्टवर थेट ३३ टक्के डिस्काउंट दिलं जात आहे. ज्यानंतर याची किंमत ९,९९९ रुपये इतकी होत आहे. याशिवाय PNB क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर अधिक १२ टक्के सूट मिळेल. याशिवाय ५ टक्के कॅशबॅक Flipkart Axis बँकेच्या कार्डने पे केल्यावर मिळणार आहे. तसंच जर जुना फोन एक्सचेंजमध्ये दिला तर थेट ९,४०० रुपये वाचवता येतील. पण इतकी सूट मिळवण्यासाठी जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे.
Redmi 11 Prime चे काही फीचर्स
या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 90HZ आहे. दमदार परफॉर्मंससाठी MediaTek Helio G99 प्रोसेसर दिला आहे. कॅमेरा फीचर्सचं म्हणाल तर Redmi 11 Prime चं बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 50MP चा प्रायमरी कॅमेरा असून 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेंसर दिला गेला आहे. तसंच अधिक बॅटरी बॅकअपसाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर