Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बॅकग्राउंड अॅप्समुळे उतरते बॅटरी
अनेक वेळा आपण बॅकग्राउंड अॅप्स लॅपटॉपवर चालू ठेवतो. यामुळे लॅपटॉपची बॅटरी अधिक लवकर संपते. अशावेळी जर तुमच्या लॅपटॉपवर बॅकग्राउंड
अॅप्स चालू असतील तर ते बंद करा. हे अॅप्स बंद करण्यासाठी तुम्हाला टास्क बारवर राईट क्लिक करावं लागेल. नंतर टास्क मॅनेजरवर जा. यानंतर, तुम्हाला जे बंद करायचे आहे त्या अॅपवर राईट क्लिक करा. त्यानंतर End Task वर क्लिक करा.
स्टार्टअप अॅप्स डिसॅबल करा
लॅपटॉपमधील स्टार्टअप अॅप्लिकेशन्स देखील बॅटरीवर खूप प्रेशर टाकतात. यासह, सिस्टमचा बूस्ट टाईम देखील वाढतो. त्यामुळे हे अॅप्स डिसॅबल करण्यासाठी, तुम्हाला टास्क मॅनेजरवर जावे लागेल. त्यानंतर स्टार्टअप अॅप्सवर टॅप करा आणि अॅपवर राइट क्लिक करा, नंतर अॅप डिसॅबल करा.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल
डिस्प्लेच्या ब्राइटनेसवरही लक्ष द्या
लॅपटॉपच्या डिस्प्लेच्या ब्राइटनेसकडे लक्ष द्या, कारण डिस्प्लेवरील ब्राइटनेस जास्त असल्यास लॅपटॉपची बॅटरी जास्त वापरली जाते. यासाठी विंडोज की आणि ए प्रेस करावे लागतील. नंतर अॅक्शन सेंटरवर दिलेल्या स्लाइडरसह ब्राइटनेस अॅडजस्ट करा.
वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
ब्लूटूथ आणि वाय-फाय बंद करा
गरज नसल्यास, तुम्हाला ब्लूटूथ आणि वाय-फाय बंद करावे लागेल. यामुळे लॅपटॉपची बॅटरी खूप वाया जाते. हे अॅक्शन सेंटरमधून देखील डिसॅबल करता येऊ शकते.
वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा
बॅटरी सेव्हर देखील मदत करेल
जर लॅपटॉपची बॅटरी कमी असेल आणि चार्ज करण्याचा कोणताही मार्ग नसेल तर तुम्हाला लॅपटॉपचा बॅटरी सेव्हर पर्याय चालू करावा लागेल. हे करुन तुम्ही बॅटरी बऱ्यापैकी वापरु शकता.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स