Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- अफगाणिस्तानमध्ये बिकट परिस्थिती
- अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले
- अमरावतीच्या श्वेताच्या धाडसाचे होतेय कौतुक
अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं एआय- २४४ या विमानाने काबुल विमानतळातून बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करत व त्यांना मार्गदर्शन करीत आपल्या मायदेशी आणले. त्यांच्या धाडसामुळं १२९ नागरिक सुखरूप परतले आहेत.
वाचाः ‘आठवा महिना लागला, राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा कधी हलणार?’
अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचे विमान पोहोचल्यानंतर विमानाला लँडिंग करू दिले जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर एअर इंडियाचे विमान काबूलच्या विमानतळावर उतरलं. त्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिक व अधिकाऱ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान भारतात सुखरूप परतले. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
वाचाः ‘मुंबई लोकलसाठी हा नियम पालिकेनं कसा ठरवला?’
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताच्या या धाडसाचे कौतुक केलं आहे. ठाकूर यांनी फोन करुन श्वेतासोबत बातचीत केली आहे. काही लागलं तर हक्कानं फोन कर, असं सांगून यशोमती ठाकूर यांनी श्वेताचं कौतुक केलं आहे. काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी गोळीबाराचे आवाज येत होते, असं श्वेतानं यशोमती ठाकूर यांना सांगितलं.
वाचाः मुंबईत पालिकेचे पहिले ई- वाहन चार्जिंग केंद्र