Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मुंबईत, महाराष्ट्र अग्निशमन दलात प्रशिक्षण आणि नोकरीची संधी

36

देशसेवा आणि जनसेवेच्या माध्यमातून आपले करिअर घडवू पाहणाऱ्या तरुण आणि होतकरू उमेदवारांसाठी महाराष्ट्र अग्निशमन दलात काम करण्याची संधी मिळू शकते. निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना अग्निशमन दलात अग्निशामक किंवा अधिकारी म्हणून काम करता येणारं आहे. सदर भरतीसाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी आणि प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांच्यावतीने निवड आणि प्रशिक्षण प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अग्निशमन दलातील कामासाठी आवश्यक असणारं हे प्रशिक्षण आणि पाठ्यक्रम अग्निशामक पदासाठी सहा महिन्यांचा तर अधिकारी पदासाठी १ वर्ष कालावधीचा आहे. हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून, सार्वजनिक आणि औद्योगिक सेवेत उमेदवारांना संधी मिळावी या हेतून हे आयोजन करण्यात येणार आहे.

(वाचा : कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा)

मोठ-मोठ्या इमारती, हॉस्पिटल्स,मॉल्स, मल्टिप्लेक्स अशा विविध क्षेत्रांत अशा उमेदवारांना मागणी असून, त्या दृष्टीने प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची तयारी करू घेतली जाते. तुम्ही ही दहावी उत्तीर्ण झालेले असून, या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास आणि नियम व अटींच्या पूर्तता केल्यानंतर तुम्हालाही यासाठी प्रवेश मिळू शकतो.

पात्रता, नियम व अटी :

  • अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराला दहावीला किमान ४५ टक्के गुण मिळाले असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त आणि भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही पात्रता ५० टक्के गुणांची ठेवण्यात आली आहे.
  • तसेच, अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.पदवीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५० टक्के तर, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण असणे आवशयक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २३ (अग्निशमन) १८ ते २५ (अधिकारी) वर्ष एवढे असावे.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती )

शारीरिक पात्रता :

– अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची किमान १६५ सेमी असणे गरजेचे आहे.
– उमेदवाराचे किमान वजन ५० किलो असावे.
– उमेदवाराची छाती सर्वसाधारण ८१ सेमी तर, फुगवून ८६ सेमी असावी.

वरील पदांसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून, अर्ज भरताना मूळ जाहिरातीबरोबरचं, तुम्ही अर्ज करू इच्छित असलेल्या पाठ्यक्रमातील नियम व अटी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

खुल्या प्रवर्गातून अग्निशामक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ५०० रुपये तर अधिकारी पदाच्या पाठ्यक्रमास अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ६०० रुपये शुल्क आकारले जाणर आहे.

तर, राखी प्रवर्गातून आर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना अनुक्रमे ४०० रुपये आणि ४५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज सादर करताना, ऑनलाइन अर्ज भरताना सादर केलेल्या कागद-पत्रांसोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवाशी दाखला, खेळाडू असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडून आदर अर्ज जमा करायचे आहे.

अधिक माहितीसाठी ९६०४४०७४०० वर संपर्क साधा किंवा भेट द्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई

पत्ता : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८
येथे भेट देणे

(वाचा : रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ३६२४ जागांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.