Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जुगार खेळण्यासाठी फसवणूक करून चोरी करत असणारे आरोपी लष्कर पोलिसांच्या जाळ्यात राज्यासह परराज्यातील 19 गुन्ह्यांची उकल
पुणे,दि.०१:- पुण्यासह इतर बँकेतून पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून विश्वास संपादित करुन चलाखीने त्यांच्याकडील रोकड लुटणार्या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.
केसांच्या तपासा त कारक माहिती पुढे आली आहे की लॉटरी व जुगार खेळण्यासाठी हा बँकेतून पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची फसवणूक करून चोरी करत होता
दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय 47, रा. पानीपत, हरियाना), सुनिल रामप्रसाद गर्ग (वय 37, रा. पानीपत, हरियाना), सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी (वय 29, रा. हरियाना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही मुळचे हरियाना येथील राहणारे आहेत. त्यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरे, परराज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असून त्यांच्याकडून १९ गुन्हे पुणे शहर पोलिसांनी उघडकीस आणण्यात यश आले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण शुक्रवार दि.३० रोजी घेतल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून आरोपी फसवणूक करायचे. राज्यासह परराज्यात देखील अशाप्रकारचे काही गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत 13 जून रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडला होता. फिर्यादी हे ढोले पाटील रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने बँकेतून 3 लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. त्यांनी बँकेतून पैसे काढले. रोकड बँगेत ठेवत असताना कॅश काऊंटरजवळ उभा असलेल्या एकाने त्यांना पेन्सिलने खुणा केलेल्या व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे, असे सांगितले. त्यांना तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले. ते घेऊन तो नजर चुकवून पसार झाला होता.
लष्कर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन दिपककुमार याला त्याच्या साथीदार सुनिल याच्यासह वेगवेगळ्या लॉज वरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरजकुमार यालाही अटक करण्यात आली.
या तिघांनी मिळून राज्यातील विविध शहरांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील , उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे. पोलीस अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोर्हाडे, रमेश चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली