Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयबीपीएसकडून लिपिक पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

10

आयबीपीएस यांच्या कडून लिपिक पदाच्या मेगा भरतीची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार यासंबंधित आवश्यक ती सगळी माहिती या लेखात मिळवू शकतात. शिवाय, IBPS च्या अधिकृत वेबसाईटवरही या संदर्भातील माहिती पाहू शकतात.

सदर भरतीसाठीचे अर्ज संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून, आयबीपीएसच्या वेबसाईटवर आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना २१ जुलै २०२३ पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.

आयबीपीएसकडून जाहीर करण्यात आलेली ही भरती क्लर्क (लिपिक) पदासाठी असून, २०२३ यावर्षात यासंदर्भातील प्रशिक्षण आणि परीक्षा होणारं असून २०२४-२५ या वर्षात उमेदवारांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

(वाचा : Western Railway Recruitment: रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ३६२४ जागांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात)

सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्कही ऑनलाइन भरायचा आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी यांसाठी १७५ रुपये तर, इतर उमेदवारांसाठी ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

पात्रता

  • या जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण झालेला असावा.
  • भरतीसाठी उमेदवाराचे वय कमीत-कमी २० वर्ष तर, जास्तजास्त २८ वर्षांपर्यंत असावे.

असे असेल वेळापत्रक :

  • उमेदवारांकडून ऑनलाइन रजिस्ट्रेशन : १ जुलै २०२३ ते २१ जुलै २०२३
  • उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जांमध्ये फेरबदल करणे आणि आवश्यक शुल्क भराणे : १ जुलै २०२३ ते २१ जुलै २०२३
  • Pre-Exam ट्रेनिंगसाठी कॉल लेटर डाउनलोड करणे : ऑगस्ट २०२३
  • Pre-Exam ट्रेनिंग : ऑगस्ट २०२३
  • ऑनलाइन परीक्षेसाठी (Preliminary) आवश्यक कॉल लेटर डाऊनलोड करणे : ऑगस्ट २०२३
  • ऑनलाइन परीक्षा (Preliminary) : ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२३
  • ऑनलाइन (Preliminary) परीक्षेचा निकाल : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाइन परीक्षेसाठी (Main) आवश्यक कॉल लेटर डाऊनलोड करणे : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाइन परीक्षा (Main) : ऑक्टोबर २०२३
  • Provisional Allotment : एप्रिल २०२४

(वाचा : Maharashtra Fire Brigade Recruitment: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मुंबईत, महाराष्ट्र अग्निशमन दलात प्रशिक्षण आणि नोकरीची संधी )

महत्त्वाचे :

– IBPS नक्की किती जागांसाठी ही भरती करणार आहे याची माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
– परीक्षेसंबंधित विविध बदल आणि तारखांविषयी माहितीसाठी उमेदवाराने आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईट वारंवार तपासणे आवश्यक आहे.
– या परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संबंधित सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचणे आवशय आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.