Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक पोस्टमधून झालं स्पष्ट
WhatsApp हे देखील Meta च्या मालकीचं असून मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे व्हॉट्सअॅपच्या या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्ट्री आता सहज ट्रान्सफर करता येणार आहे. ते पूर्णपणे सुरक्षित असेल, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. चॅटच्या साईजबद्दलही कोणतीही अडचण येणार नाही, म्हणजे तुमच्या चॅटमध्ये मोठ्या फाइल्स किंवा अटॅचमेंट्स असल्या तरी चॅट सुरळीतपणे ट्रान्सफर होईल.
पण सारखीच ऑपरेटिंग सिस्टम असणं महत्त्वाचं
पण हे चॅट ट्रान्सफर करताना एक महत्त्वाची कंडीशन अशी आहे की, दोन्ही उपकरणांमध्ये एकच ऑपरेटिंग सिस्टम असणं आवश्यक आहे, म्हणजे चॅट केवळ तेव्हाच ट्रान्सफर करता येईल जेव्हा दोन्ही फोन एकतर आयफोन किंवा अँड्रॉइड असतील म्हणजे आयफोनवरून अँड्रॉइडवर आणि अँड्रॉइडवरून आयफोनवर, चॅट स्कॅनिंगद्वारे ट्रान्सफर होणार नाहीत. या सर्वाचा एक व्हिडीओही मार्क झुकरबर्ग यांनी शेअर केला आहे.
क्लाउड बॅकअपद्वारे सध्या होतं चॅट ट्रान्सफर
सध्या, क्लाउड बॅकअप चॅट्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. QR कोड स्कॅन करण्याच्या प्रक्रियेत, डेटाचा क्लाउडवर बॅकअप घेतला जाणार नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या WhatsApp डेटाचा बॅकअप घेण्याचीही गरज नाही.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल
नेमकी प्रक्रिया कशी?
या प्रक्रियेत म्हणजे चॅट ट्रान्सफर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन व्हाट्सअॅप स्थानिक वाय-फाय नेटवर्क वापरते म्हणजेच ते दोन उपकरणांमध्ये वाय-फाय नेटवर्क तयार करते. क्यूआर कोडवरून चॅट्स ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या फोनच्या व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट्सवर क्लिक करून चॅट्स ट्रान्सफरवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळेल, जो तुम्हाला नव्याने स्कॅन करावा लागेल.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स
WhatsApp नं आणलं आणखी एक भारी फीचर
WhatsApp कंपनी लवकरच एक आणखी फीचर लाँच करणार आहे. ज्याच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाठवण्यास मदत होईल. व्हॉट्सअॅपने यापूर्वी एचडी फोटो पाठवण्याचे फिचर आणले होते. त्यानंतर आता, एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी एक खास फीचर कंपनी आणत आहे. यामुळे युजर्सना एक भारी मल्टीमीडिया अनुभव मिळणार आहे. हे फीचर सध्या बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे.
वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा