Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एअरटेल की जिओ? ६६६ रुपयांमध्ये कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट?

8

नवी दिल्ली : Jio and Airtel 666rs Mobile Recharge : भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देखील अमर्यादित फायद्यांसह एक योजना आणत आहे. अधिक वैधतेसह, एअरटेलच्या या प्लानमध्ये दररोज दमदार डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये इतके बरेच फायदे दिले जात आहेत. एअरटेलच्या ६६६ रुपयांच्या प्लानबद्दल जाणून घेऊया. तसेच, जिओ देखील ६६६ रुपयांचा प्लान ऑफर करत असून त्याबद्दलही जाणून घेऊ.

एअरटेलचा ६६६ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ७७ दिवसांची आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा दिला जाईल. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाईल. दररोज १०० एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय काही अतिरिक्त फायदेही दिले जात आहेत. यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा दिला जाईल. तसेच, अपोलो 24|7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचं सब्सक्रिप्शन दिलं जाणार आहे.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

जिओचा ६६६ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये एअरटेलपेक्षा जास्त वैधता दिली जात आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. दररोज १.५ जीबी डेटा देखील दिला जात आहे. ज्यामुळे संपूर्ण वैधता पकडल्यास एकूण १२६ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. JioTV, JioCinema, JioCloud सुविधेसह दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. अमर्यादित 5G डेटा देखील कंपनी उपलब्ध करून देत आहे.

वाचा : आता WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं झालं एकदम सोपं, फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.