Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतातील पहिलं एआय विद्यापीठ महाराष्ट्रात सज्ज; ऑगस्ट महिन्यापासून होणार सुरुवात

11

Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप बदलणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होऊन, दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा मोलाचा वाट आहे.
जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून एआय लोकांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनायला लागला आहे.

आज, मशीन्सना तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात, एडिटिंग आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच कामे करतात. पण, एआयला माहिती पुरवणारे आणि हे तंत्रज्ञान विकसित करणारे तंत्र शिकण्याची संधी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना मिळाली तर…? हो खरं आहे आणि हे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला परदेशवारी करायचीही गरज नाही. कारण, भारतातील पहिले एआय विद्यापीठ तुमच्यासाठी सज्ज झाले आहे.

आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असे बोलले जाते. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

‘युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (AI Universal University) असे या विद्यापीठाचे नाव असून, १ ऑगस्टपासून या विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.

(वाचा : Bennett University Awards : ‘बेनेट विद्यापीठा’च्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान)

देशातील पहिले एआय विद्यापीठ :
महाराष्ट्रात मुंबईजवळ कर्जत येथे स्थापन करण्यात आले आहे. ग्रीन कॅम्पस असलेल्या या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिले विद्यापीठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईजवळ सुरु झाले आहे.

जाणून घ्या अभ्यासक्रमांविषयी :

  • मुंबईजवळील कर्जत येथे १ ऑगस्टपासून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (Specialized Courses) सुरू करण्यात येत आहे.
  • या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिले जाणार आहे.
  • यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
  • या विद्यापीठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कम्प्युटर्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.
  • व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)

ही आहे विद्यापीठाची वैशिट्ये :

-देशातील ही पहिले AI University महाराष्ट्रात मुंबईजवळील कर्जतमध्ये स्थित आहे.
– या विद्यापीठामध्ये एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
– जागतिक घडामोडी, कायदा, पर्यावरण, क्रीडा आणि विज्ञान सोबत व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटर यांसारख्या नव्या-जुन्या विषयांच्या संमिश्रित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
– जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी AI शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
– AI विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत.
– प्रत्येक विषय शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा चा वापर केला जाणार आहे.
– तरुणांना ऑगमेंटेड रिॲलिटी, मिक्स्ड रिॲलिटी, आयओटी, ब्लॉकचेन शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी विशेष प्रयोगशाळा (लॅब) तयार करण्यात आली आहे.
– विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

(वाचा : दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मुंबईत, महाराष्ट्र अग्निशमन दलात प्रशिक्षण आणि नोकरीची संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.