Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तर Motorola Razr 40 ची सुरुवाती किंमत ही ५९,९९९ रुपये असणार आहे. तर Motorola Razr 40 Ultra ची किंमत ८९,९९९ रुपये असणार आहे. हा फोन विवा मँजेटा आणि इन्फिनीटी ब्लॅक या कलरमध्ये आणला आहे. तर Motorola Razr 40 हा सेज ग्रीन, वेनिला क्रिम आणि समर लिलेक या रंगात आहे. याशिवाय Motorola Razr 40 Ultra हा ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास थेट ७ हजार वाचवता येतील. तर Motorola Razr 40 वर ५ हजारापर्यंत वाचवता येणार आहेत.
Motorola Razr 40 Ultra चे फीचर्स
मोटोरोला रेझर अल्ट्रामध्ये ६.९ इंचाची फुलएचडी + स्क्रीन आहे. तसेच हँडसेटमध्ये ३.६ इंचाची फुलएचडी+ स्क्रीन बाहेरच्या बाजूस आहे. Razr 40 Ultra स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे.Motorola Razr 40 Ultra मध्ये OIS सपोर्टसह १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या इनफिनिट ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू व्हेरियंटमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो. फोनची बॅटरी 3800mAh आहे. जी 33W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे.
Motorola Razr 40 चे फीचर्स
या फोनमध्ये अल्ट्रा मॉडेलसारखाच डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर आहेत. पण यात Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर असून कॅमेरा फीचर्स अधिक दमदार आहे. यात ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. बॅटरीही याची मोठी असून 4,200 mAh इतकी आहे.
वाचा :जिओचा 4G फोन भारतात लाँच, किंमत फक्त ९९९ रुपये, १२३ रुपयांपासून मंथली रिचार्ज प्लान