Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Samsung Galaxy S21 FE 5G आता स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह लाँच होणार असल्याने याचं काम आणखी फास्ट होणार आहे. सॅमसंग कंपनीने देखील या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला आहे. फोनच्या लाँच तारखेबाबत सध्या कोणतीही बातमी समोर आलेली नाही पण यासाठी बुकिंग सुरू झाली आहे. तर हा स्नॅपड्रॅगन 888 4 नॅनोमीटर प्रक्रियेवर तयार करण्यात आला आहे. यासह, ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU उपलब्ध आहे. Galaxy S21 FE 5G भारतात 256 GB स्टोरेजसह ऑफर केला जाईल. याआधीचा Galaxy S21 FE 5G गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ५४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. ही किंमत 128 GB स्टोरेज सह व्हेरिएंटची होती. त्याच वेळी, 256 जीबी स्टोरेजची किंमत ५८,९९९ रुपये होती, परंतु आता फोनची सुरुवातीची किंमत आता ३२,९९९ रुपये असू शकते.
Samsung Galaxy S21 FE 5G (2022) चे फीचर्स
Galaxy S21 FE 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4 देण्यात आला आहे. याशिवाय, यात 120Hz च्या रीफ्रेश दरासह ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड 2x डिस्प्ले ५ आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत RAM सह 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy S21 FE 5G चा कॅमेरा
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये तीन रेअर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये पहिली लेन्स १२ मेगापिक्सलची अल्ट्रावाइड आहे. त्याच वेळी, दुसरी लेन्स १२ मेगापिक्सेल वाइड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स ८ मेगापिक्सेलची टेलीफोटो लेन्स आहे ज्यामध्ये 30x ऑप्टिकल झूम उपलब्ध असेल. समोर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Samsung Galaxy S21 FE 5G बॅटरी
या सॅमसंग फोनमध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4500mAh बॅटरी आहे. यात वायरलेस पॉवरशेअर देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Samsung Pay, NFC, फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत. फोनला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68 रेटिंग मिळाली आहे.
वाचा :जिओचा 4G फोन भारतात लाँच, किंमत फक्त ९९९ रुपये, १२३ रुपयांपासून मंथली रिचार्ज प्लान