Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ट्विटरवर iSoftware Updates ने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, अॅपमध्ये व्हिडिओ प्ले केल्यानंतर होम स्क्रीनवर गेल्यानंतरही व्हिडिओ प्ले होत राहील. हे फंक्शन जसे यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवर चालते त्याच पद्धतीने काम करेल. या नवीन पिक्चर-इन-पिक्चर फीचरमुळे ट्विटर यूजर्स व्हिडिओ पाहताना इतर अॅप्स वापरू शकतील. असे दिसते आहे की Twitter हळूहळू हे फीचर आणत आहे. त्यामुळे हे फीचर प्रत्येक डिव्हाईसपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागू शकतो.
यापूर्वी शनिवारी १ जुलै रोजी देखील जगभरातील ट्विटर वापरकर्त्यांना या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर समस्यांना सामोरे जावे लागले होते. वापरकर्ते त्यांच्या फीडमध्ये ट्विट पाहू शकले नाहीत. यापूर्वी, सोशल मीडिया साइटवर अशाप्रकारचा इश्यू आला होता. आता सद्यातरी ट्विट पाहण्यासाठी वापरकर्त्यांकडे खाते असणे आवश्यक आहे.
TweetDeck वापरण्यासाठी आता लागणार पैसे
सध्या TweetDeck मध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला https://tweetdeck.twitter.com/ वर जाणे आवश्यक आहे. येथे तुम्ही एका ठिकाणीू सर्वकाही शोधू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा विषय शोधायचा असेल तर तुम्ही तो एका कॉलममध्ये शोधू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खाते हाताळायचे असेल तर तुम्ही ते एका कॉलममध्ये देखील उघडू शकता. तुम्ही एकाच स्क्रीनवर सूचना, प्रत्युत्तरे इत्यादी पाहू शकता. आतापर्यंत TweetDeck ची सेवा पूर्णपणे मोफत होती. पण आता ट्वीटरचे मालक एलन मस्क यांनी फक्त ब्लू टिक वापरकर्ते TweetDeck ऍक्सेस करणार असल्याचं सागितलं आहे. आता मोफत वापरकर्त्यांसाठी, ही सेवा पुढील ३० दिवसांनंतर बंद केली जाईल.
वाचा : नॉन वेरिफायड युजर्सना Twitter चा धक्का, आता आणखी एक सुविधा वापरण्यासाठी आकारणार पैसे