Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त पदांसाठी भरतीला सुरुवात; थेट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी

13

Central Bank of India Recruitment: बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल १००० जागांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील विविध ठिकाणच्या शाखांमध्ये काम करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील व्यवस्थापक स्केल II (Manager Scale II) या पदांसाठी ही भरती असून, या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची तयारी असणाऱ्या, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्जांव्यतिरिक्त केले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइनपद्धतीने होणार असून, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जाहिरातीमधील पात्रता निकष व अटींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अर्ज सादर करताना दिलेली कागदपत्रे, उमेदवारासंबंधित व शैक्षणिक पात्रतेबाबत कोणतीही माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास सदर उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर थेट रद्द केला जाईल. या संबंधितचे सर्व अधिकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

उपलब्ध पद आणि आरक्षणानुसार जागांची विभागणी :

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही भरती Manager Scale II (Mainstream) पदासाठी असून, तब्बल १००० जागांसाठी ही भरती आहे. यात एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० जागा, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५ जागा, ईडब्ल्यूएस करता १००, ओबीसी करता ४०५ तर ४०५ जागा जनरलसाठी असणार आहेत.

उमेदवारांची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता, अटी आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी सगळी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या CBI Recruitment या माहितीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क :

सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्जासोबत अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवशयक आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यू बीडी आणि महिला उमेदवारांना १७५ रुपये + १८ टक्के GST तर इतर सर्व उमेदवारांना ८५० रुपये + १८ टक्के GST एवढे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा अर्ज :

० अर्जदाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन Click Here To Apply Online वर क्लिक करा
० उमेदवाराने आवश्यक ती सगळी माहिती अर्जामध्ये भरावी
० अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने फोटो आणि स्वतःची सही अर्जात अपलोड करायची आहे.
० भरली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करायचा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.