Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Best Camera Smartphones : दमदार कॅमेरा क्वॉलिटी हवीये? सध्या ‘या’ ५ स्मार्टफोन्सची मार्केटमध्ये आहे हवा
Samsung Galaxy F54 5G
Samsung Galaxy F54 5G मध्ये अॅस्ट्रोलॅप्स फीचर देण्यात आले आहे, जे अगदी आकाशातील ताऱ्यांचे फोटो देखील क्लिक करण्यात मदत करेल. कमी लाईटमधील फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर त्यात नाइटग्राफी फीचर देण्यात आले आहे. हे रात्रीच्या वेळी फोटो क्लिक करण्यास मदत करते. शिवाय, Samsung Galaxy F54 5G 108MP (OIS) नो शेक कॅमेरा फीचरनेही सुसज्ज आहे. यात हाय-रेझोल्यूशन आणि शेक-फ्री फोटोग्राफी फीचरही आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत ३१,९९९ रुपये आहे.
Google Pixel 6a
गुगलचा हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटसह येत असून याची किंमत २७,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये अनेक दमदार कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये फेस अनब्लर फीचर आहे जे ब्लर चेहऱ्यांना देखील शार्प करण्यास मदत करते. तसेच, यात रिअल टोन फीचर आहे जे वेगवेगळ्या त्वचेच्या टोनचे सुंदर दिसणारे फोटो क्लिक करते. त्याचे इन-कॅमेरा मॅजिक इरेजर टूल स्पष्ट आणि भारी फोटो क्लिक करण्यासाठी मदत करते.
Realme 11 Pro+ 5G
रिअलमीच्या या फोनमध्ये 200MP सुपरझूम कॅमेरा आहे. त्यात OIS आणि 4X इन-सेन्सर झूम हे फीचर देण्यात आले आहेत. हे इंडस्ट्री फर्स्ट 4x लॉसलेस झूम, 2X पोर्ट्रेट मोड आणि ऑटो-झूम तंत्रज्ञानासह दमदार फीचर्सनी परिपूर्ण आहे. याशिवाय, हा फोन अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह कॅमेरा मोड जसे की SuperOIS, स्ट्रीट फोटोग्राफी मोड, नाईट मोड इत्यादींनी सज्ज आहे. यात सुपर नाईटस्केप विथ मून मोड आणि स्टाररी स्काय मोडचीही सुविधा आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंटसह येणाऱ्या या फोनची किंमत २७,९९९ रुपये आहे.
वाचा : Twitter वर देखील व्हिडीओ पाहण्याचा अनुभव होणार एकदम भारी, युट्यूबसारखं खास फीचर होणार लाँच
Vivo V27 5G
विवोचा हा Vivo V27 5G फोन नाईट-टाइम पोर्ट्रेट फोटोग्राफी मोडसाठी एकदम बेस्ट आहे. हे फीचर फोटो ऑथेंटिक बनविण्यात मदत करते. यात Sony IMX766V सेन्सर आहे, जो फोटोंना दमदार टोनसह वेगळा लुक देतो. या फोनचे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) दीर्घ एक्सपोजर शॉट्स कॅप्चर करताना देखील फोनला स्थिर ठेवते. याच्या मदतीने तुम्हाला चांगले फोटो मिळतात. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटसह येणाऱ्या या फोनची किंमत ३२,९९९ रुपये आहे.
वाचा : नॉन वेरिफायड युजर्सना Twitter चा धक्का, आता आणखी एक सुविधा वापरण्यासाठी आकारणार पैसे
Oppo Reno 8T 5G
यात फोनमध्ये १०८ मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा, प्रीमियम मायक्रोलेन्स, २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या फोनचा मायक्रोलेन्स कॅमेरा तुम्हाला अप्रतिम फोटो घेण्यास मदत करतो. हा 40x पर्यंत झूम फीचर लांबची गोष्टही कॅप्चर करण्यात मदत करते, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बारीकसारीक तपशील देखील मिळेल. याव्यतिरिक्त, याचा बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट फीचर DSLR सारखी बॅकग्राउंड ब्लर करणारी फोटोग्राफी करण्यात मदत करतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटसह येणाऱ्या या फोनची किंमत २९,९९९ रुपये आहे.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स