Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Twitter ला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामनं आणलं Threads App, वाचा काय आहे खास?

14

नवी दिल्ली : मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने ट्वीटरशी स्पर्धा करण्यासाठी आपले नवीन अ‍ॅप थ्रेड्स नुकतेच लाँच केले आहे. हे एक नवीन सोशल नेटवर्किंग अ‍ॅप आहे. त्याची थेट स्पर्धा ट्विटरशी असेल. थ्रेड्स अ‍ॅप ट्वीटरसारखेच आहे. तसेच, इन्स्टाग्रामचे काही फिचर्स देखील यात जोडण्यात आले आहेत. एकीकडे एलन मस्कने ट्विटर पेड केल्यानंतर, मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी स्वतःला ट्विटरपासून दूर केले आहे. इन्स्टाग्रामने या युजर्सना आपल्या नवीन प्लॅटफॉर्म थ्रेड्समध्ये जोडण्याचा प्रयत्न केला असून नेमकं या Threads App बद्दल जाणून घेऊ…

कुठे डाउनलोड करायचे?
थ्रेड्स अ‍ॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच ते अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय, वापरकर्ते डेस्कटॉपवर साइटवरून देखील थ्रेड्स वापरण्यास सक्षम असतील.

थ्रेड्समध्ये काय आहे खास?

  • युजर्स थ्रेड्सवर जास्तीत जास्त ५०० कॅरेक्टरसह पोस्ट करण्यास सक्षम असतील. यासोबतच यूजरला फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याचे फीचरही देण्यात आले होते. वापरकर्ते थ्रेड्स अ‍ॅप वर सध्या ५ मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकतील.
  • तुम्ही Instagram युजर असल्यास, तुम्हाला थ्रेड्ससाठी वेगळे खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करायचे आहे. यानंतर अ‍ॅप आपोआप लॉगिन होईल. यासाठी पासवर्डची गरज नाही.
  • एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला थ्रेड्सवरील कॉन्टॅक्टची संपूर्ण यादी दिसेल आणि तुम्ही त्यापैकी कोणाला फॉलो करायचे आहे ते तुम्ही ठरवू शकाल.
  • वापरकर्त्याला थ्रेड्स अ‍ॅप चे प्रोफाइल सार्वजनिक आणि खाजगी ठेवण्याचे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.
  • सध्यातरी थ्रेड्स एक जाहिरात मुक्त अ‍ॅप आहे. पण थ्रेड्सचा वापर वाढल्यावर या अ‍ॅपवरही जाहिराती दाखवायला सुरुवात होईल हे निश्चित. थ्रेड्स अ‍ॅप चा लूक आणि फील हुबेहूब इन्स्टाग्रामप्रमाणे आहे. पण फीचर्स हे ट्वीटरसारखे असणार आहेत.

वाचा : Vodafone Idea नं आणले दोन भन्नाट रिचार्ज, Super Day आणि Super Hour पॅकमध्ये आहेत खास बेनिफिट्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.