Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या आहेत राष्ट्रीयीकृत बँकासाठी असणार भरती:
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकामधील रिक्त पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
(वाचा : IIT Admission: परदेशातील पहिला आयआयटी कॅम्पस; शिक्षण मंत्रालयाकडून झाला रीतसर करार)
IBPS ने जाहीर केलेल्या या भरतीत लिपिक पदांच्या एकूण ४ हजार ४५ हुन अधिक जागा रिकाम्या असून, या जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झाली आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाईटवरही या संदर्भातील अधिक माहिती उपलब्ध आहे.
सदर भरतीसाठीचे अर्ज संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून, आयबीपीएसच्या वेबसाईटवर अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना २१ जुलै २०२३ पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.
आयबीपीएसकडून जाहीर करण्यात आलेली ही भरती क्लर्क (लिपिक) पदासाठी असून, २०२३ यावर्षात यासंदर्भातील प्रशिक्षण आणि परीक्षा होणारं आहेत. तर २०२४-२५ या वर्षात उमेदवारांच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
निवड प्रक्रिया:
- सदर लिपिक या पदांकरिता उमेदवारांची ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्ये पुर्व परीक्षा (Preliminary Examination) घेण्यात येईल.
- त्यानंतर ऑक्टोंबर २०२३ मध्ये सदर भरतीसाठी आवश्यक मुख्य परीक्षा (Main Examination) घेण्यात येईल.
- त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल .
(वाचा : PGCIL Recruitment 2023: ‘पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये तब्बल १०३५ जागांसाठी महाभरती; आत्ताच करा अर्ज)
अशी असेल परीक्षेची रचना :
पुर्व परीक्षा (Preliminary Examination)
(फोटो सौजन्य : IBPS Website)
मुख्य परीक्षा (Main Examination)
(फोटो सौजन्य : IBPS Website)
निवड झालेल्या उमेदवारांना वर नमुद केलेल्या बँकांच्या देशाभरातील कोणत्याही शाखेमध्ये नोकरी करावी लागेल. वर दिलेल्या सर्व बँका या राष्ट्रीयीकृत असून, या बँकांच्या बँकांची देशभरांमध्ये शाखा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती या पैकी कोणत्याही बँकेच्या, कोणत्याही शाखेत केली जाऊ शकते. शिवाय, निवड झालेल्या उमेदवारांची दोन वर्षांचा प्रोबेशनरी कालावधी असणार आहे.
(वाचा : Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त पदं; थेट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी)