Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट्स अशा विविध पदांसाठी ही पदभरती असणार आहे.
विविध पदांचा तपशील आणि रिक्त पद संख्या :
एकूण पद संख्या : ५६ रिक्त पद
- कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow – JRF) : २९ पद
- वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow – SRF) : १७ पद
- संशोधन सहयोगी (Research Associate- RA) : १० पद
(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)
अर्जदारांची शैक्षणिक पात्रता :
० केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर
उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे
० केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षे रिसर्च
उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे
० पीएच.डी. (केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) आणि ३ वर्षे रिसर्च
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे
(वाचा : ISRO Recruitment 2023: इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी)
असा करा अर्ज :
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज सादर करण्यासाठी Apply Here वर क्लिक करा.
- त्यानंतर, तुम्हाला JRF, SRF, RA दिसतील.
- त्यापैकी तुम्ही ज्या पदाकरिता अर्ज सादर करू इच्छित असला (JRF, SRF, RA
- तुम्हाला, आवश्यक त्या पदासंबंधित आवश्यक माहिती दिसेल.
- स्क्रिनवर दिसणारी माहिती काळजीपूर्वक वाचून रजिष्ट्रेशनला सुरुवात करा.
- तुमचे पूर्ण नाव आणि जन्म दिनांक निवडून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- लॉग इन करून अर्ज पूर्ण करा.
(वाचा : NExT Exam Updates: National Exit Test थेट पुढच्या वर्षी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली घोषणा)