Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio नं लाँच केले दोन स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान, किंमत १९ रुपयांपासून सुरु

9

नवी दिल्ली : Jio Latest Data Plans: तुम्हीही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Jio ने एकाच वेळी दोन नवीन आणि स्वस्तात मस्त असे प्लान आणले आहेत. जिओच्या या प्लानची किंमत फक्त १९ रुपये आणि २९ रुपये इतकी आहे. जिओचे हे प्लान त्यांच्यासाठी आहेत ज्यांना अधिक डेटाची गरज आहे. चलातर जाणून घेऊया जिओच्या या दोन्ही प्लानबद्दल सविस्तर…

जिओचा १९ रुपयांचा प्लान
सर्वप्रथम, जिओच्या या १९ रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये एकूण १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. या डेटा प्लानची वैधता तुमच्या फोनमध्ये जो प्लान असेल त्या इतकीच असेल. ही योजना इमरजन्सीमध्ये डेटाची गरज लागल्यास त्यासाठी आहे. तुमच्या विद्यमान प्लानचा डेटा संपल्यास, तुम्ही हे रिचार्ज करून घेऊ शकता. एकूणच, हा एक प्रकारचा डेटाबुस्टर प्लान आहे.

जिओचा २९ रुपयांचा प्लान
Jio चा हा आणखी एक डेटाबुस्टर प्लान २९ रुपयांना आहे. यामध्ये एकूण २.५ जीबी डेटा येतो. हा प्लान देखील तुमच्या विद्यमान प्लानइतकाच असेल. हा देखील एक डेटा प्लान असल्यामुळे गरजेच्या वेळी इंटरनेट डेटा मिळवण्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. जिओचा २५ रुपयांचा डेटा प्लान देखील आहे ज्यामध्ये २ जीबी डेटा उपलब्ध आहे.

जिओने आणला Jio Bharav V2 4G फोन
जिओने नुकताच Jio Bharat V2 लॉन्च केला आहे ज्याला Jio Bharat फोन देखील म्हटले जाते. Jio Bharat V2 ची किंमत फक्त ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Jio Bharat V2 बाबत, कंपनीने “2G मुक्त” भारताचा नारा दिला आहे. Jio ने म्हटले आहे की Jio Bharat V2 द्वारे ते २५० दशलक्ष 2G ग्राहकांना 4G नेटवर्कवर आणण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. कंपनीने Jio Bharat V2 साठी दोन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. यात १२३ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये एकूण १४ जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे आणि २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. दुसऱ्या प्लानची किंमत १,२३४ रुपये आहे यामध्ये इंटरनेट डेटासह अनलिमिटेड कॉलिंग हे सारंकाही ३५६ दिवसांसाठी मिळेल.

वाचा : Smartphone tips : तुमचा नवीन फोन बनावट तर नाही ना? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टी नक्की चेक करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.