Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लेटेस्ट Oppo Reno 10 5G सिरीज भारतात लाँच, 100W फास्ट चार्जिंगसह दमदार कॅमेरा

14

नवी दिल्ली : Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ 5G हे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नुकतेच लाँच करण्यात आले आहेत. ओप्पो कंपनीने Oppo Reno 10 5G सिरीद अंतर्गत हे फोन लाँच केले आहेत. यातील Reno 10 5G ची किंमत २० जुलै रोजी उघड होणार असून इतर दोन्ही मॉडेल्सची किंमत समोर आली आहे. या फोन्समध्ये नवीन काय आहे? नेमक्या किंमतीसह फीचर्स सविस्तर जाणून घेऊ…

Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G, Reno 10 Pro+ 5G किंमत
तर वर सांगितल्याप्रमाणे Reno 10 5G ची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. त्याची किंमत २० जुलै रोजी समोर येईल. दुसरीकडे, Reno 10 Pro 5G बद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. याशिवाय, Reno 10 Pro + 5G त्याच प्रकारात लाँच केला गेला आहे जो 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत ५४,९९९ रुपये आहे. तर Oppo Reno 10 Pro 5G आणि Oppo Reno 10 Pro+ 5G ची विक्री १३ जुलैपासून सुरू होईल. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट, ओप्पो इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात. हे दोन्ही फोन ग्लॉसी पर्पल आणि सिल्व्हर ग्रे कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. Reno 10 5G आईस ब्लू आणि सिल्व्हरी ग्रे कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Oppo Reno 10 Pro+ 5G चे फीचर्स
हे Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर कार्य करते. यात HDR 10+ सपोर्टसह ६.७४ इंचाचा AMOLED 3D कर्व्ह डिस्प्ले आहे. यासह, 120Hz LTPS डायनॅमिक रिफ्रेश रेट उपस्थित आहे. याचे रेझोल्यूशन 1240×2722 पिक्सल आहे. त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ कोटिंग आहे. फोनमध्ये 12 GB रॅम आहे. तसेच, हा फोन Octa-core Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC ने सुसज्ज आहे. त्याचा रॅम 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. तसेच 256 GB स्टोरेज देण्यात आले आहे. Oppo Reno 10 Pro + 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ६४ मेगापिक्सल, ५० मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल यातीन कॅमेऱ्यांसह ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 4700 mAh बॅटरी आहे जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Oppo Reno 10 Pro 5G चे फीचर्स
यात ६.७ इंचाचा फुल-एचडी + OLED 3D कर्व्ह डिस्प्ले आहे. यात HDR10+ सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. याचे रेझोल्यूशन 1080X 2412 पिक्सल आहे. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 778G 5G SoC वर काम करतो. यात 12 GB रॅम आहे जी 8 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 256 GB GB स्टोरेज दिले जाईल. Reno 10 Pro 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ५०, ३२ आणि ८ मेगापिक्सलचे कॅमेरे असून ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 80W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह 4600mAh बॅटरी आहे.

वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.