Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

45

नवी दिल्ली : WhatsApp Translucent Tab and Navigation Bar : तुम्ही जर iPhone वर WhatsApp वापरत असाल तर आता तुम्हाला लवकरच अ‍ॅपचा UI अर्थात युजर इंटरफेस बदललेला दिसेल. कंपनीने नुकतेच अ‍ॅपचे डिझाइन बदलले आहे आणि आता तुम्हाला अ‍ॅपमध्ये Translucent टॅब आणि नेव्हिगेशन बार पाहायला मिळतील. हे अपडेट मिळवण्यासाठी, तुम्हाला अ‍ॅप लेटेस्ट आवृत्तीवर अपडेट करावे लागेल. याशिवाय, अ‍ॅपमध्ये तुम्हाला अपडेटेड स्टिकर ट्रे आणि अवतार स्टिकर्सचा मोठा सेट पाहायला मिळेल. या अपडेटची माहिती व्हॉट्सअ‍ॅपसंबधी विविध अपडेट्स आणि बातम्या देणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे.

WhatsApp वेबवर लॉग इन करणे सोपे झाले
आता WhatsApp वेबवर लॉग इन करणे आणखी सोपे झाले आहे. तुम्ही मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील लिंक डिव्हाईसच्या ऑप्शनवर जाऊन लॉगिन विथ मोबाईलचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वेब उघडा आणि येथे मोबाइलसह लॉगिनचा पर्याय निवडा आणि नंबर प्रविष्ट करा. आता इथे तुम्हाला एक कोड मिळेल, तो मोबाईलवर टाका. असे केल्याने, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते वेबवर लॉगिन होईल. ज्या लोकांचा मोबाईल कॅमेरा खराब झाला आहे आणि ते QR कोडने स्कॅन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरेल.
वाचा : Smartphone tips : तुमचा नवीन फोन बनावट तर नाही ना? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टी नक्की चेक करा

‘या’ वैशिष्ट्यावर सुरु आहे काम
WhatsApp स्टिकर सजेशन फीचरवर काम करत आहे. ते आल्यानंतर, जेव्हा तुम्ही चॅट बारमध्ये कोणतेही इमोजी ठेवता तेव्हा ते त्याच्याशी संबंधित स्टिकर्स सुचवेल आणि तुम्ही स्टिकर्सद्वारे स्वतःला व्यक्त करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्याला रडणारा इमोजी पाठवत असाल, तर अ‍ॅप रडण्याचे स्टिकर्स सुचवेल, ज्यामुळे मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत आणखी चांगल्या रितीने पोहोचेल.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.