Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Redmi 12 च्या लाँचिंगची प्रतिक्षा अखेर संपणारं! ‘या’ तारखेला होणार सादर

19

नवी दिल्ली : Xiaomi Redmi 12 स्मार्टफोनच्या लाँचिंगची प्रतिक्षा आता संपणार आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. नुकतीच Xiaomi ने Redmi 12 लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने याबाबत एक ट्वीट केलं आहे की Redmi 12 स्मार्टफोन १ ऑगस्ट २०२३ ला लाँच केला जाईल.

Redmi 12 हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो काही देशांमध्ये लाँच देखील झाला आहे. फोन MediaTek G88 चिपसेट सपोर्ट सह येईल. फोन ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप सह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा असेल. फोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. Redmi 12 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल.

किंमतीचं काय?

Redmi 12 स्मार्टफोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये मिडनाईट ब्लॅक, ब्लॅक पोलर सिल्व्हर आणि स्काय ब्लू शेडमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट जवळपास १७,००० रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Redmi 12 स्मार्टफोनचे फीचर्स

हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर काम करेल. फोनमध्ये ६.७९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह ऑफर केला जाऊ शकतो. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये MediaTek Helio G88 चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोन 8GB LPDDR4X रॅम सपोर्टसह येईल. ज्याला 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Redmi 12 मध्ये AI समर्थित ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असेल. तसंच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाईल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

वाचा : Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.