Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fire Boltt Gladiator : लूकमध्ये अगदी Apple Watch Ultra प्रमाणे जबरदस्त, किंमत फक्त २,४९९ रुपये

16

नवी दिल्ली : Fire Boltt Gladiator Smartwatch : तुम्हाला अ‍ॅपल वॉच आवडते पण ती विकत घेण्याचं बजेट नाही? तर एक स्मार्टवॉच आहे जी Apple Watch Ultra सारखी दिसते. ही वॉच आहे देशांतर्गत स्मार्टवॉच ब्रँड फायर-बोल्टची ग्लेडिएटर वॉच. फायर-बोल्ट ग्लॅडिएटर अगदी अ‍ॅपल वॉच सारखी दिसते, याचे फीचर्सही जबरदस्त आहेत. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

फायर-बोल्ट ग्लॅडिएटरची किंमत
अ‍ॅपल वॉच अल्ट्रा ८९,९०० रुपये आहे. त्याच वेळी, या ग्लेडिएटरची किंमत फक्त २,४९९ रुपये आहे. हे Amazon वरून विकत घेता येतीस. या दोघांच्या किमतीत जवळपास ३५ पट फरक आहे.

फायर-बोल्ट ग्लॅडिएटरचे फीचर्स
यात १.९६ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. त्याची रचना अल्ट्रा स्लिम फ्रेमसह येते. यात १२३ स्पोर्ट्स मोड आहेत. तसेच, हृदयाच्या गतीचा मागोवा घेण्यापासून रक्तातील ऑक्सिजनचे निरीक्षण करण्यापर्यंत अनेक गोष्टी यात करता येतात. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आले आहे. इनबिल्ट स्पीकरसह मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट्स आणि डायलर अ‍ॅप देखील आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे. यात 5 GPS आधारित क्रियाकलाप ट्रॅकिंग मोड आहेत. तसेच ते क्रॅक प्रतिरोधक आहे.

दोन्हीमध्ये फरक काय?

दिसण्यात या दोन्ही वॉच खूप समान आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की Fire Boltt या घड्याळात Apple Watch Ultra सारखीच क्षमता आहे. Apple वॉचमध्ये पाण्याची खोली मोजणे, तापमान ट्रॅकिंग, जीपीएस वे-ट्रॅकिंग, अति तापमान सपोर्ट, प्रगत GPS सपोर्ट, 180 मीटरपर्यंत आपत्कालीन अलार्म आणि 2000 निट्स डिस्प्ले यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.