Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या प्रवेशाला अंतिम मुदतवाढ; विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज

14

दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी एकूण ३७५ संस्थामध्ये मिळून साधारणपणे १ लाख जागा उपलब्ध आहेत.

या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ३० जून आणि त्यानंतर ७ जुलैपर्यंत मुदतवाढ करून दिली होती. आता पुन्हा एकदा या तारखेत बदल करण्यात आला आहे.

विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे.

(वाचा : Best Engineering Colleges: ही आहेत महाराष्ट्रातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस; आयआयटी-मुंबईसह मुंबईच्या या कॉलेजांचाही समावेश)

शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ७ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.

मात्र, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) कॉलेजांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांअभावी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विविध अडचणी येत असल्यामुळे, तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे, तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना आता ही तारीख पुढे ढकलून विद्यार्थ्यांना १५ जुलै अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, थेट द्वितीय वर्ष पदवीका प्रवेशाची अंतिम तारीख २० जुलैपर्यंत वाढवली आहे.

थोडक्यात :

इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु असून आहे.
प्रवेश प्रक्रियेसंबंधीत माहितीबरोबरच, अर्ज सादर करणे आणि पडताळणी ही याच वेबसाईटवर सुरु आहे.
प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यात ३२८ सुविधा केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकानुसार,

  • ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी आणि अर्ज निश्चिती : १५ जुलैपर्यंत
  • तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल : १७ जुलै
  • गुणवत्ता यादीवरील आक्षेप (त्रुटी व सुधारणा) नोंदणी : १८ आणि १९ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल : २१ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित प्रदर्शित करणे : २२ जुलै
  • विकल्प अर्ज भरून निश्चित करणे : २३ ते २६ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी तात्पुरते जागावाटप प्रदर्शित करणे : २८ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी उमेदवाराने ऑनलाइन प्रवेश स्वीकृती : २९ जुलै ते ३ ऑगस्ट
  • पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी वरील पायरी पूर्ण केलेली असल्यास उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे : २९ जुलै ते ४ ऑगस्ट

कागदपत्रे नसल्यास हमीपत्र घेणार :

प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्र कमी असल्यास, त्यांच्याकडून तात्पुरते हमीपत्र घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर अशी प्रमाणपत्र केलेल्या अर्जाच्या पोचपावतीची प्रत जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेता येणार आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीपर्यत मूळ कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे.

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचा अर्ज dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येईल. या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होणार असून, तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या मुदतवाढी बाबत माहिती दिली आहे.

(वाचा : ही आहेत देशातील टॉप १० मेडिकल कॉलेजेस; येथे प्रवेश घेणे हे प्रत्येक NEET UG-PG पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.