Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘बाईपण’ बॉक्स ऑफिसवरही ‘भारी’, रितेश देशमुखच्या ‘वेड’ नंतर केदार शिंदेंनी करुन दाखवलं!

11

मुंबई: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच राज्यभरातली चित्रपटगृहं आणि दमदार कमाईनं बॉक्स ऑफिसवरही ‘भारी’ ठरलं आहे. या चित्रपटाला महिला प्रेक्षक तुडुंब गर्दी करीत असल्याचं चित्र सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत बघायला मिळत आहे. ‘बाईपण…’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत आहे; पण हा चित्रपट बनवायला कुणीच तयार नव्हतं. याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ‘या चित्रपटासाठी चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये वर्षभर निर्माता शोधत होतो. मी ज्यांना ही गोष्ट ऐकवायचो, त्यांना ती आवडायची. मात्र, ‘जत्रा’ या चित्रपटासारखं काही व्हायला पाहिजे, असं ते म्हणायचे. सहा महिला असलेला चित्रपट का करायचा असा प्रश्न त्यांना पडे. तेव्हा मला वाटायचं, मी त्यांना कसं पटवून देऊ की या सहा महिलाच जादू करणार आहेत. सहा अभिनेत्रींना चित्रपटाची संहिताही दिली होती; पण तेव्हा निर्माता मिळाला नव्हता.’

Tharla Tar Mag: पूर्णा आजीला समजणार सायलीच तन्वी असल्याचं सत्य? दोघींनी एकमेकींना कडकडून मारली मिठी
सिनेमाचा ‘भारी’पणा

गेल्या १०-१५ वर्षांत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, त्यातले मोजकेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले. चांगले विषय असूनही काही चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडले. काही चित्रपटांनी उत्तम आशय तर दिलाच; शिवाय चांगली कमाईही केली. ‘दुनियादारी’, ‘सैराट’, ‘वेड’, ‘धर्मवीर’, ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’ या अलीकडच्या काळातल्या चित्रपटांची नावं या यादीत घेता येतील. आजही मराठीतला सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘सैराट’च्या नावावर आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’नं मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तो सिलसिला आता ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं कायम ठेवला आहे.

महिलावर्ग प्रेक्षक

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दिप्ती परब या अभिनेत्रींचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. या सहाही अभिनेत्रींचा वेगवेगळा प्रेक्षकवर्ग आहे; परिणामी त्या प्रेक्षकांना विशेषत: महिलावर्गाला थिएटरकडे चित्रपटगृहांकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. चित्रपटगृहांत ६० ते ६५ टक्के महिला प्रेक्षकवर्ग येत असल्याचा अंदाज आहे. ठाणे, पुण्यातल्या काही चित्रपटगृहांत संपूर्ण शोमध्ये केवळ महिला प्रेक्षकवर्गच असल्याचं चित्र आहे.

‘आई’ने ‘बाई’साठी शेअर केला खास Video; म्हणाली- मराठी माणूस आजही एकत्र येऊ शकतो
बाईपण भारी देवाच्या बॉक्स ऑफिस कमाईबाबतचे ठळक मुद्दे

– १० दिवसांत २६.१९ कोटींची कमाई केल्याचं निर्माते जिओ स्टुडिओजनं जाहीर केलं आहे.

– राज्यभरात प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला ५०० स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला.

– दुसऱ्या आठवड्यात स्क्रीन्सची संख्या ७०० पर्यंत वाढली.

– सध्या आठवड्याला ७५० स्क्रीन्सवर चित्रपट दाखवला जात आहे.

– आठवड्याला १४ हजारांहून अधिक शो सुरू आहेत.

– निम्म्याहून अधिक चित्रपटगृहांतले शोज हाऊसफुल आहेत.

– ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दुबई या देशांमध्येही चित्रपट प्रदर्शित झाला.

– आगामी काळात ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट इतर प्रादेशिक भाषांत डब केला जाण्याची शक्यता आहे.

सिनेसृष्टीला फायदा

याबाबत मूव्हीटाइम सिनेमाजचे सुनील घोलप यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘वेड’नंतर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही शो वाढवले आहेत. ही परिस्थिती मराठी चित्रपटसृष्टीला सुखावणारी आहे. प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडे आल्यानं त्याचा फायदा आगामी मराठी चित्रपटांनाही होईल.

Aai Kuthe Kay Karte: संजना देणार अनिरुद्धला घटस्फोट; सासूबाईंनीच दिला सल्ला- ‘माझ्या मुलाला सोडून जा’
प्रेक्षकांची ताकद

जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेट प्रमुख निखिल साने यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘एरवी चित्रपटगृहांत पुरुष प्रेक्षक आणि तरुणांची गर्दी असते. यावेळी महिला प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, लातूर या सगळ्यांच ठिकाणी हाऊसफुल प्रतिसाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अधिक विश्वास मिळाला आहे. मध्यंतरीच्या काळात प्रेक्षकांचा चित्रपटगृहांकडे येण्याचा ओघ कमी झाला होता. मात्र, आता जाणकार प्रेक्षक मराठी चित्रपटाला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल.’

लोक म्हणाले, माझे सिनेमे चालणार नाहीत, आता ‘पठाण’मुळे मागची ४ वर्ष विसरलो | शाहरुख खान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.