Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून मुंबईतून सुरुवात.
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ राणे यांना येऊ न देण्याची शिवसेनेची भूमिका.
- बाळासाहेब ठाकरे हे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत- प्रवीण दरेकर.
शिवसेनेने इशारा दिला असला तरी राणे यांनी आपल्या यात्रेत कोणताही बदल केलेला नाही. आज गुरुवारी सकाळी १० वाजता राणे विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या यात्रेची सुरुवात करणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राणे यांच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर राणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारक आणि शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन करणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवासाठी महापालिकेची नवी नियमावली; पाहा, काय आहेत नियम!
राणेंनी यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला
आपल्या वेळापत्रकानुसार राणे आपली यात्रा सुरू करणार असले तरी आपल्या यात्रेतून ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ वगळणार असल्याचे वृत्त आहे. वरळीत राणे यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणे अशक्य: उदय सामंत
बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे- प्रवीण दरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ येऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली आहे. याला भारतीय जनता पक्षाने मात्र विरोध दर्शवला आहे. नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल. या यात्रेमुळे विकास व विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- बहुरूपी कालावंतांचे होतायत पोटापाण्याचे हाल; सुरू आहे जगण्यासाठी धडपड