Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

UPSC मुख्य परीक्षेसाठी अर्ज सुरू, परीक्षेस पात्र उमेदवारांना या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

67

UPSC CSE 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या DAF-1 (Detailed Application Form 1) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

UPSC CSE 2023 DAF 1 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. DAF 1 हा फॉर्म सबमिट केल्यानंतर, पात्र अर्जदारांसाठी ई-प्रवेशपत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या तीन-चार आठवड्यांपूर्वी वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे.

UPSC ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षेच्या नियमांनुसार या परीक्षेत पात्र ठरत असलेल्या सर्व अर्जदारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षेसाठी तपशीलवार अर्ज फॉर्म-१ म्हणजेच (DAF-I) अर्ज विहित वेळेत सादर करणे आवश्यक असणार आहे.

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांनी DAF-I ऑनलाइन भरणे आणि ते ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे. लोक सेवा आयोगाच्या Detailed Application Form 1 चे फॉर्म लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर १० जुलै २०२३ ते १९ जुलै २०२३ सायंकाळी ६ वाजेपर्यत भरणे आवश्यक आहे.

यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षेसाठी २०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार असून, महिला उमेदवार आणि SC, ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

UPSC CSE मुख्य परीक्षेनंतर मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो.

UPSC CSE 2023 मुख्य परीक्षेसाठी अर्ज कसा करावा
उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर Mains 2023 लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
फी भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर मुख्य 2023 परीक्षेचा फॉर्म सबमिट करा.
यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.