Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कधी तयार झालाय तुमचा स्मार्टफोन? स्वत: तुमचा फोनच सांगेल, पाहा खास फीचर

7

नवी दिल्ली : Google ने अलीकडेच Android 14 चा बीटा-4 अपडेट आणला आहे. या आवृत्तीमध्ये एक नवीन आणि उत्कृष्ट फीचर येणार आहे, ज्यानंतर फोन कधी तयार झाला आहे हे तुम्हाला फोनच्या मदतीनं कळेल. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये नवीन ऑप्शन दिसणार आहे. तर आजकाल सर्वात गरजेची वस्तू म्हणजे स्मार्टफोन. आपण प्रत्येकजण आपला स्मार्टफोन फार जपत असतो, त्यात वॉरंटी असेल किंवा आणखी काही स्मार्टफोन कधी तयार झाला आहे, हे आपणा सर्वांना माहित हवे असते. आता एका नवीन अपडेटच्या मदतीने तुम्ही ही माहिती चुटकीसरशी सांगू शकाल. गुगलच्या अँड्रॉइड १४ अपडेटच्या लाँचची तयारी सुरू आहे.
तर अँन्ड्रॉईड १४ च्या अपडेटपूर्वी Google ने अलीकडेच Android 14 चा बीटा-4 जारी केला आहे. या आवृत्तीमध्ये हे नवीन फीचर येणार आहे, ज्यानंतर फोन कधी तयार झाला आहे हे स्वतःच सांगेल. यासाठी सेटिंगमध्ये नवीन मेनू दिसेल. नवीन अपडेटनंतर फोनची मॅन्युफॅक्चरिंग पाहण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अबाऊट फोनमध्ये मॉडेलमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला तारीख दिसेल.

गुगलने आताच आणले आहे Help me Write फीचर
गुगलने अलीकडेच एआय-संचालित हेल्प मी राइट फीचर जारी केले आहे. आत्तापर्यंत, Gmail मध्ये हेल्प मी राइट वैशिष्ट्य केवळ डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी वर्कस्पेस लॅबचा भाग म्हणून उपलब्ध होते. नवीन AI फीचर वापरकर्त्यांच्या इनपुटवर आधारित ईमेल ड्राफ्ट तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरते. कंपनीचे म्हणणे आहे की, या फीचरमध्ये यूजरच्या प्रॉम्प्टच्या मदतीने मेसेज टाईप करता येतो.

हेल्प मी राइट वैशिष्ट्य कसे काम करेल?
Google ने दिलेल्या माहितीनुसार ईमेल तयार करण्यासाठी Gmail मध्ये नवीन एआय-सक्षम हेल्प मी राइट फीचर कसे वापरावे हे देखील स्पष्ट केले आहे. वापरकर्ते iOS आणि Android साठी Gmail वर कंपोज बटण टॅप करू शकतात आणि स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे हेल्प मी राईट फीचर वापरु शकतात.

वाचा : Smartphone Care : स्मार्टफोनचा चार्जर होणार नाही खराब, फक्त चुकूनही ‘या’ चुका करू नका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.