Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना; परीक्षा केंद्राला पूर्वकल्पना न देता परीक्षेचे आयोजन

11

मुंबई विद्यापीठाच्या IDOL (Institute of Distance & Open Learning) म्हणजेच दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या गलथान कारभाराचा आणि नाकर्तेपणाचा आता विद्यार्थ्यांसह प्राचार्यांनाही कंटाळा आलाय असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रखडणारे निकाल, वेळापत्रकातील सततच्या चुका, परीक्षा आणि निकालातील संभ्रम अशा अनेक समस्यांचा पाढा वाचण्याचा विद्यार्थ्यांनाही आता वीट आला आहे.

यावेळी तर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, परंतु परीक्षा केंद्राला विद्यापीठाच्या वतीने कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पाहून परीक्षा केंद्र असलेल्या कॉलेज आणि तिथल्या प्राचार्य आणि प्राध्यापकांची एकच तारांबळ उडाली.

विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या MCom Sem II आणि Sem IV परीक्षांना ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. ११ तारखेला एमकॉम IV चा Supply Chain Management and Logistics (सप्लाय चैन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स) विषयाचा पेपर दुपारी २.३० ते ४.३० यावेळेत होणार होता. सदर परीक्षेसाठी ‘भवन्स हजारीमल सोमानी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स (भवन्स कॉलेज, गिरगाव चौपाटी) हे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. त्यामुळे वेळापत्रक आणि त्यांना मिळालेल्या हॉल तिकीटवरील तपशीलाप्रमाणे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, परीक्षा केंद्रावरील प्रकार ऐकून विद्यार्थी चक्रावले तर, आपल्या कॉलेजमध्ये अवघ्या काही वेळात परीक्षा होणार असल्याचे कळताच भवन्स कॉलेज प्रशासनाची धावपळ सुरु झाली.

(वाचा : University Of Mumbai: आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांच्या ऑनलाइन अर्जांना सुरुवात)

भवन्स कॉलेज आयडॉलच्या परीक्षेचे केंद्र असणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना विद्यापीठाने कॉलेजला दिली नसल्यामुळे हा गोंधळ उडाला असा कॉलेज प्रशासनाचा तक्रारीचा सुरु आहे. तर, परीक्षेची पूर्वकल्पना ईमेलच्या माध्यमातून कॉलेजला दिली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून दिली जात आहे.

भवन्स कॉलेजमधील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी प्रसंगावधान लक्षात घेऊन तातडीने विदयापीठ प्रशासनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, विद्यापीठातून तो फोन उचला गेला नसून ऐनवेळी परीक्षा केंद्रावर काय करावे याचे उत्तर कोणाचकडे नव्हते. अखेर, भवन्स कॉलेजमधील प्राद्यापकांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून प्रश्नपत्रिकांच्या प्रति काढून विद्यार्थ्यांचा पेपर सुरु करून घेतला.

विद्यापीठाचे हे वागणे नवीन नाही…

यापूर्वी ३० मार्चला रामनवमीच्या दिवशी सर्वत्र सुट्टी असताना अनेक विद्यार्थी मात्र परीक्षा केंद्र असणाऱ्या भवन्स कॉलेजला परीक्षा देण्यासाठी पोहोचले. मात्र तेव्हाही कॉलेजला परीक्षेसंदर्भात काहीही माहिती मिळाली नसल्याने परीक्षेसंदर्भात सावळा गोंधळ तेव्हाही पाहायला मिळाला होता. त्यावेळीही विद्यापीठाने ईमेल करून कॉलेजला कळवले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा ईमेल कॉलेजच्या माजी प्राचार्यांना करण्यात आला असावा असा अंदाज कॉलेज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यावेळीही असाच गोंधळ घालत विद्यापीठाने पुन्हा एकदा गलथान कारभाराचा पुरावा दिला आहे.

(वाचा : Dr. Tanu Jain Success Story: डेंटल सर्जन ते सरकारी अधिकारी, वाचा डॉ. तनु जैनचा प्रेरणादायी प्रवास)

विद्यापीठ म्हणतंय…

११ जुलैला घडल्या प्रकाराबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स.कॉम’ने मुंबई विद्यापीठाच्या Institute of Distance & Open Learning सोबत संपर्क साधला असता

  • विद्यापीठाने भवन्स कॉलेजला परीक्षेसंदर्भात पूर्वकल्पना परीक्षेच्या २ ते ३ दिवस अगोदर देण्यात आल्याचे सांगितले.
  • शिवाय, परीक्षेच्या दिवशी घडल्या प्रकारात विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याकडे दिले गेले.
  • सदर परीक्षा केंद्रावरील (परीक्षा केंद्र : भवन्स कॉलेज, गिरगाव चौपाटी) विद्यार्थ्यांचे पेपर उशीरा सुरु झाले आणि त्यांना पेपर लिहिण्यासाठी तेवढा अधिक वेळही देण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले.
  • मात्र, सलग दुसऱ्यांना घडलेल्या या गोंधळाची जबाबदारी झटकत विद्यापीठाने या गोंधळाबाबत समाधानकारक उत्तर देणे टाळले.

ईमेल नक्की जातोय कुठे…?

विद्यापीठानेही भवन्स कॉलेजला ईमेल करून पूर्वकल्पना दिल्याचे सांगितले आहे. शिवाय,
भवन्स कॉलेज प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजच्या माजी प्राचार्यांना ईमेल गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, सध्या कार्यरत असलेल्या भवन्स कॉलेजच्या प्राचार्यांना ईमेल येत नाही का…? आणि तो येत नसेल तर या मागचे कारण नक्की काय असेल याकडे विद्यापीठ प्रशासनाबरोबरच भवन्स कॉलेजनेही लक्ष देणे गरजेचं आहे.

(वाचा : MBBS Fees: राज्यात वैद्यकीय शिक्षण महागणार; मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्के वाढ)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.