Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lenovo Tab M10 5G : दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, दमदार साऊंडसह भन्नाट फीचर्स, लेनोवोचा लेटेस्ट टॅब भारतात लाँच

9

नवी दिल्ली : Lenovo कंपनीने भारतीय बाजारात आपला मिड-रेंज टॅबलेट Lenovo Tab M10 5G लाँच केला आहे. हा टॅब 5G कनेक्टिव्हिटी आणि ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Lenovo Tab M10 मध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. Lenovo Tab M10 5G मध्ये १०.६१ इंचाचा LCD डिस्प्ले आणि दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप दिला आहे. बॅटरी बॅकअपबाबत कंपनीचा दावा आहे हा टॅब तब्बल ५५ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम देते.

Lenovo Tab M10 5G किंमत आणि फीचर्स

Lenovo Tab M10 5G ला ब्लू कलर शेड्स मध्ये सादर करण्यात आले आहे. हा टॅब एक मिड रेंज टॅब असून या टॅबची सुरुवातीची किंमत २४,९९९ रुपये आहे. Lenovo Tab M10 5G 15 जुलैपासून Flipkart, Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल. याचे फीचर्स म्हणाल तर १०.६१ इंचाचा LCD डिस्प्ले आहे. डिस्प्ले (1200 x 2000 पिक्सेल) रेझोल्यूशनसह, 400 nits ब्राइटनेससोबत उपलब्ध आहे. टॅबलेट Android 13 वर चालवतो आणि ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर यात असून 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे.

कॅमेऱ्याचं काय?

लेनोवोच्या या नवीन टॅबच्या कॅमेरा सपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा मागील कॅमेरा आहे. टॅब्लेटमध्ये 7,700mAh बॅटरी आहे. बॅटरी बॅकअपबद्दल, कंपनीचा दावा आहे की ते १२ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक आणि ५५ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक वेळ देते. हा टॅब डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञान आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकरने सुसज्ज आहे. Lenovo Tab M10 5G वर कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे तर, यात ब्लूटूथ 5.1, USB टाइप-C आणि 3.5mm ऑडिओ जॅक समाविष्ट आहे.

वाचा : Smartphone Tricks : पॉवर बटन न वापरता ऑन करु शकता फोन, ‘या’ आहेत ५ सोप्या ट्रिक्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.