Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लहान वयात उचलली घरची जबाबदारी, पण गश्मीर महाजनीचं नक्की शिक्षण किती?

10

देऊळबंद, कॅरी व मराठा, डोंगरी का राजा, कान्हा, धर्मवीर अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आणि ‘झलक दिखला जा’ या प्रसिद्ध डान्स शो मधून घर-घरात पोहचलेले नाव म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी. मराठी सिनेविश्वातील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचा तो मुलगा. आपल्यातली अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.

८ जून १९८५ मध्ये जन्म झालेल्या गश्मीरचे शालेय शिक्षण पुण्यात झाले आहे. आदर्श शिक्षण मंडळी संस्थेच्या अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीअम हाय स्कुल (Abhinava Vidyalaya English Medium High School) गश्मीरने शालेली शिक्षण पूर्ण केले आहे.

पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून गश्मीरने वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केलेली आहे. असे, असलेले तरी आपले शिक्षणपूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.

(वाचा : Dr. Tanu Jain Success Story: डेंटल सर्जन ते सरकारी अधिकारी, वाचा डॉ. तनु जैनचा प्रेरणादायी प्रवास)

एक उत्तम प्रशिक्षित डान्सर असणाऱ्या गश्मीरने दहावीत असताना, वयाच्या साधारण १५-१६ व्य वर्षी घराच्या अडचणींमध्ये हात भार लागावा म्हणून स्वतःच्या पहिली डान्स अकादमीची सुरुवात केली. भरपूर मेहनतीच्या जोरावर अवघ्या दोन वर्षातच गश्मीरने घरावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करत सगळी परिस्थिती पूर्ववत केली.

तत्कालीन घरची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने आपली आवड आणि कला असणाऱ्या डान्सला आपल्या व्यवसायाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या परिस्थितीत घराच्या जबाबदाऱ्या, स्वतःची डान्सची आवड आणि अकादमीची जबाबदारी या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पाडत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. शिवाय, तब्बल २० वर्षांहून अधिक काळ गश्मीर जीआराएम डान्स अकादमी चालवत असून, डान्सर्सच्या अनेक पिढ्या त्याने घडवल्या आहेत.

लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड असणाऱ्या गश्मीरने अखेर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय विश्वात येण्याचा निर्णय घेतला. २०१० च्या ‘मुस्कुराके देख जरा’ या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून गश्मीरने अभिनय विश्वात पदार्पण केले. विविध मराठी चित्रपट, बॉलीवूडपट, रियायलीटी शोजच्या माध्यमातून गश्मीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.

(वाचा : MU Idol Exams: विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना; परीक्षा केंद्राला पूर्वकल्पना न देता परीक्षेचे आयोजन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.