Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Honor MagicPad 13 च्या 8 GB RAM सह 256 GB स्टोरेजची किंमत २,९९९ चीनी युआन म्हणजे सुमारे ३४,३३० भारतीय रुपये आहे. त्याच वेळी, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजची किंमत 3,299 चीनी युआन म्हणजे सुमारे ३७,७०० रुपये आणि 16 GB रॅम असलेल्या आणि 512 GB स्टोरेजची किंमत ३,६९९0 युआन म्हणजे सुमारे ४२,४०० रुपये आहे. Honor MagicPad 13 Azure, Star Gray आणि Moonlight रंगांमध्ये खरेदी करता येईल.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्सHonor MagicPad 13 चे इतर फीचर्स
Honor MagicPad 13 मध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 13-इंच 2.5K रिझोल्यूशन TFT LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 700 nits आहे. याशिवाय, यात HDR10 सह IMAX सर्टिफिकेशन देखील आहे. यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. यात Android 13 आधारित MagicOS 7.2 आहे. Honor MagicPad 13 मध्ये वर सांगितल्याप्रमाणे १३ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आणि ९ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 स्पीकर आणि 4 मायक्रोफोन आहेत. 3D ऑडिओ फीचरही याच देण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील दिलं आहे. टॅबचे एकूण वजन 660 ग्रॅम आहे.
वाचा : Smartphone Care : स्मार्टफोनचा चार्जर होणार नाही खराब, फक्त चुकूनही ‘या’ चुका करू नका