Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Pixel 7 Pro एकदम स्वस्तात विकत घेण्याची संधी, ही खास ऑफर एकदा पाहाच

12

नवी दिल्ली : Google Pixel 7 Pro अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. सध्या फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल सुरु असून हा सेल १९ जुलैपर्यंत चालेल. फ्लिपकार्टच्या या सेलमध्येच, Google Pixel 7 Pro आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल. तर Google Pixel 7 Pro मागील वर्षी Tensor G2 या लेटेस्ट चिपसेटसह सादर करण्यात आला होता. यावरच आता भन्नाट डिस्काउंट मिळत आहे.

Google Pixel 7 Pro हा ८४,९९९ रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता पण आता तो अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. आता हा फोन फक्त ६७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही Google Pixel 7 Pro खरेदी करण्यासाठी HDFC बँक कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला ४,००० रुपयांची सूट मिळेल. Flipkart १५०० रुपयांची सूट Axis Bank क्रेडिट कार्डवर देखील देत आहे.

कसा आहे Google Pixel 7 Pro?

Google Pixel 7 Pro zirconia-blasted aluminium body design मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे, जो 3,120 x 1,440 पिक्सल रेझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमधील Tensor G2 प्रोसेसरसह टायटन M2 प्रोसेसर सुरक्षिततेसाठी सपोर्टेड आहे. Pixel 7 Pro मध्ये 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज आहे. Google Pixel 7 Pro सह VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) सपोर्टेड आहे. मात्र, हे फीचर भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध केले जाईल की नाही याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.
Google Pixel 7 Pro ला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. प्राथमिक कॅमेऱ्यासह 2X झूम उपलब्ध आहे. दुसरी लेन्स १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आहे आणि तिसरी ४८ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आहे. टेलिफोटो लेन्ससह 30x सुपर रिझोल्यूशन झूम आणि 5x ऑप्टिकल झूमही सपोर्टेड आहे. फोनमध्ये १०.८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. गुगल पिक्सेल 7 प्रो सह सिनेमॅटिक व्हिडिओ देखील शूट केला जाऊ शकतो. फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट सपोर्टेड आहे.

वाचा : WhatsA pp Tricks : मित्राचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आवडलं? सोप्या स्टेप्स फॉलो करुन लगेच करु शकता डाऊनलोड

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.