Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

11

IIT Global Campus: अभियांत्रिकी किंवा बी-टेक सारख्या अभ्यासक्रमांची आणि त्यात आपले करिअर घडवण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजेच इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology).

आजवर सर्वदूर आपल्या नावाची ख्याती पसरवलेल्या आयआयटीने आता जगभरातल्या विविध देशामध्ये आपले कॅम्पस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आयआयटीच्या पहिल्या ग्लोबल कॅम्पसची स्थापना पूर्व आफ्रिका देशातील टांझानियामध्ये होणार असल्याची घोषणा केली होती.

(वाचा : IIT Admission: परदेशातील पहिला आयआयटी कॅम्पस; शिक्षण मंत्रालयाकडून झाला रीतसर करार)

आता, आयआयटी दिल्लीचे अबू धाबीमध्ये कॅम्पस सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयआयटी दिल्लीच्या अबू धाबी कॅम्पसची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने भारतीय शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल.”, असेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

(वाचा : अमेरिकेतील सेंट ल्युईस विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य सहकार्याचा करार)

शिक्षण मंत्रालय आणि अबू धाबीच्या शिक्षण आणि ज्ञान विभाग (Abu Dhabi Department of Education and Knowledge : ADEK) यांनी आखाती देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कॅम्पस स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

केंद्रीय शिक्षण विभागाकडून IIT ला जागतिक बनवण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. आयआयटी दिल्ली हे दुसरे आयआयटी आहे, ज्याने देशाबाहेर कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयआयटी मद्रासने गेल्या आठवड्यात झांझिबार, टांझानिया येथे कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला.

पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढील वर्षी जानेवारीपासून अबू धाबी कॅम्पसमध्ये उपलब्ध करून दिले जातील, तर पदवीपूर्व-स्तरीय कार्यक्रम सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.अबु धाबीमधील या कॅम्पसमधील शैक्षणिक कार्यक्रम आणि शिकवण्याची पद्धत आयआयटी दिल्लीनुसार असेल आणि पदवी देखील फक्त आयआयटी दिल्ली द्वारे प्रदान केली जाणार आहे.

IIT दिल्लीने एका निवेदनात म्हटले आहे की, “२०२२ च्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये स्वाक्षरी झालेल्या व्यापक आर्थिक भागीदारी करारामध्ये (CEPA) UAE मध्ये IIT कॅम्पस स्थापन करण्याची कल्पना पुढे आली होती. शिक्षण मंत्रालयाने योग्य वेळी देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी आयआयटी दिल्लीलाचे कॅम्पस परदेशात स्थापन करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे

(वाचा : IIT Admission: JEE Main आणि JEE Advanced नंतर बीटेक करायचा विचार असेल तर…)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.