Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Realme Pad 2 चे संभाव्य फीचर्स
या टॅबमध्ये ११.५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी 8360mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच, तुम्ही टॅबची बॅटरी 33W फास्ट चार्जरने चार्ज करु शकता. जरी Realme ने अधिकृत तपशील जाहीर केला नाही. पण हा टॅब ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल, अशी माहिती समोर येत आहे.
लाइव्ह इव्हेंट कुठे बघायचा?
Realme चा लाइव्ह इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येईल. तसेच तुम्ही फेसबुक आणि ट्वीटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
Realme C53 स्मार्टफोन ही लवकरच होणार लाँच
Realme Pad 2 सोबत, त्याचा बजेट स्मार्टफोन Realme C53 भारतात लाँच होऊ शकतो. या फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा दिला जाईल. तसेच, डेप्थ किंवा मॅक्रो कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. फोन 5000mAh बॅटरीसह येईल. फोन ५२ मिनिटांत ५० टक्के चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. फोन ६.४ इंच LCD डिस्प्ले सह येईल. हा फोन 4GB रॅमसह 64GB स्टोरेजमध्ये तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायामध्ये सादर केला जाऊ शकतो.
वाचा : WhatsA pp Tricks : मित्राचं व्हॉट्सअॅप स्टेटस आवडलं? सोप्या स्टेप्स फॉलो करुन लगेच करु शकता डाऊनलोड