Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्हिडिओ एडिट करणं होणार सोपं
नवीन एडिटिंग टूल्सच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या व्हिडिओंमध्ये म्युझिक, फिल्टर आणि इतर इफेक्ट जोडू शकणार आहेत. वापरकर्ते त्यांचे व्हिडिओ ट्रिम आणि कट करू शकतील तसेच शीर्षक आणि मथळे जोडू शकतील. याव्यतिरिक्त, वापरकर्ते एचडीआरमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यासही सक्षम असतील, जे अधिक स्पष्ट रंग आणि दर्जेदार व्हिडिओ क्वॉलिटी अपलोड करण्यास मदत करेल.
आणखीही नवीन फिचर्सही उपलब्ध होतील
नवीन व्हिडिओ टॅब वापरकर्त्यांना Facebook वर व्हिडिओ शोधणे आणि पाहणे आणखी सोपे करेल. कंपनीने जुन्या वॉच टॅबला यासह बदलले आहे आणि ते लवकरच शॉर्टकट बारवर दिसेल असे सांगितले आहे. मेटा याला “रील्स, मोठे व्हिडिओ अशा सर्व Facebook वरील सर्व व्हिडिओंसाठी एक-स्टॉप शॉप” असं म्हणत आहे. Meta च्या मते, “Videos” हा पर्याय Android अॅपच्या वरच्या बाजूला आणि iOS आवृत्तीच्या तळाशी असेल.
रील बनवणे ही होणार सोपे
वापरकर्त्यांना स्वतंत्र रील्स विभागासह व्हिडिओंच्या वैयक्तिक फीडद्वार ब्राउझ करण्याची सुविधा देखील दिली जाणार आहे. कंपनीने सांगितले की ते Facebook फीडमध्ये Reels एडिट करणे, अपलोड करणे हे सारं करु शकणार आहेत. मेटा त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर रील आणि व्हिडिओ कंटेंट फॉरमॅट्स वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. या वर्षी मार्चमध्ये, मेटाने फेसबुकसाठी रील्सची मर्यादा 60 सेकंदांवरून 90 सेकंदांपर्यंत वाढवली.
वाचा : एलन मस्कचं टेन्शन आणखी वाढलं, Threads लाँच होताच ट्वीटरच्या ट्रॅफिकमध्ये ११ टक्के घट