Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

केंद्र सरकारच्यावतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ट्रेनिंग; आजच करा Free रजिस्ट्रेशन

10

AI Training Workshop by Government of India: Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या विश्वाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली आहे. दिवसागणिक प्रत्येक क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता)महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण भाग बनायला सुरुवात केली आहे.आज, मशीन्सना तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात, एडिटिंग आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच कामे करतात. पण, एआयला माहिती पुरवणारे आणि हे तंत्रज्ञान विकसित करणारे तंत्र शिकण्याची संधी तुम्हालाही मिळाली तर…? हो हे सहज शक्य आहे आणि तेही अगदी मोफत…

देशातील तरुण-तरुणींमधील कौशल्याला वाव मिळावा या उद्देशाने भारत सरकारने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एआय फॉर इंडिया २.० (AI For India 2.0)असे प्रशिक्षण कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण प्रशिक्षण देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येकासाठी मोफत उपलब्ध असणार आहे. हे प्रशिक्षण संपूर्णतः ऑनलाइन असून, एआयविषयी प्राथमिक माहिती आणि प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाणार आहे. तसेच, या कार्यशाळेत (Training Session) मध्ये सहभागी होणाऱ्या आणि प्रशिक्षण घेणाऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

१५ जुलैला ‘जागतिक युवा दिना’चे औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरु झालेला हा प्रोग्रॅम स्किल इंडिया, आयआयटी मद्रास, आयआयएम अहमदाबादाची कंपनी जीयूव्हीआय यांचा संयुक्त उपक्रम आहे. देशातील भाषिक विविधता लक्षात घेता हे प्रशिक्षण सध्या इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिया, मराठी आणि गुजराती अशा नऊ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

AI ची माहिती देशातील अधिकाधिक तरूणांपर्यत पोहोचावी आणि प्रादेशिक भाषांमधून प्रशिखसन दिल्यास हे काम अत्यंत सोप्पे होणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे संगणयत येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास, तो इतर भाषांमध्येही उपलब्ध करणार असल्याचेही केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी :

  • या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या अधिकृत लिंकवर क्लिक करा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली माहिती योग्य आणि अचूक भरून नोंदणी पूर्ण करा.
  • १४ ऑगस्ट २०२३ पर्यत या कार्यक्रमासाठी नोंदणी करता येणार आहे.
  • हा आर्यक्रम संपूर्णतः ऑनलाइन स्वरूपात पार पडणार असून, यशस्वी तरुणांना केंद्र सरकारच्या वतीने इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
  • सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.