Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईने उचललेल्या या पावलाचे स्वागत करत, ट्विटच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला या निर्णयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.”CBSE च्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल सीबीएसईचे अभिनंदन करतो. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शाळांमध्ये भारतीय भाषा-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे. शिक्षणातून चांगले परिणाम दिसून येण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात आहे.” अशा आशयाचं ट्विट धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
(वाचा : CBSE Exam 2024: सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सोडलेला नमुना पेपर,असे डाऊनलोड करा सँपल पेपर)
सीबीएसईचे एज्युकेशन डिरेक्टर जोसेफ इमॅन्युएल शाळांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात :
- बहुभाषिक माध्यमातून शिक्षण देण्यासाठी काही आव्हाने येऊ शकतात, मात्र त्यावर मात करणं शक्य आहे.
- शाळांना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
- संबंधित भाषेतील शिक्षकांची उपलब्धता, बहुभाषिक पाठ्यपुस्तके, कालमर्यादा ही मुख्य आव्हाने आहेत.
- हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शाळा उपलब्ध संसाधने शोधू शकतात, क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात आणि इतर शाळांची मदतही घेऊ शकतात आणि मदत करूही शकतात.
- शिवाय, उच्च शिक्षण प्राधिकारणाने आता अनेक भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, तसेच विविध भाषांमध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत.
- तांत्रिक, वैद्यकीय, व्यावसायिक, कौशल्य, कायद्याचे शिक्षण इत्यादींची पाठ्यपुस्तके आता भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच शाळांमध्ये बहुभाषिक शिक्षणाचा पाया तयार करणं महत्त्वाचं आहे
२१ जुलै २०२३ रोजी बोर्डाने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्या प्रमाणे, “CBSE शी संलग्न शाळा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची ८ मध्ये नमूद केलेल्या भारतीय भाषांचा वापर मूलभूत टप्प्यापासून माध्यमिक टप्प्याच्या शेवटपर्यंत म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गापासून ते बारावीपर्यंतच्या इतर पर्यायांव्यतिरिक्त पर्यायी माध्यम म्हणून विचार करू शकतात.”
CBSE Board च्या म्हणण्यानुसार, NCERT ने बहुभाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. ज्यामुळे, पुढच्या सत्रापासूनच सर्व विद्यार्थ्यांना २२ अनुसूचित भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं उपलब्ध होणार असलयाचे बोलले जात आहे.
(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)