Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amazon Prime Day सेलमध्ये सॅमसंगचा ‘हा’ फोन ठरला नंबर १, यंदाचा अ‍ॅमेझॉन सेल होता फारच खास

8

नवी दिल्ली : Amazon Prime Day Sale 2023 Best Products : आघाडीची ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनचा यंदाचा प्राईम डे सेल नुकताच १५ आणि १६ जुलै रोजी पार पडला. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये यंदाचा सेल हा सर्वात यशस्वी होता. प्राइम डे २०२२ च्या तुलनेत यंदा १४ टक्के अधिक प्राइम सदस्यांनी खरेदी केली. तर आजकाल ऑनलाईन सेलमध्ये सर्वाधिक विक्री ही स्मार्टफोन्सचीच होत असून यंदाही मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेलमध्ये विकले गेले, ज्यात सॅमसंग कंपनीच्या बजेट स्मार्टफोनने बाजी मारली.

हा फोन म्हणजे नुकताच लाँच झालेला Samsung Galaxy M34. Samsung Galaxy M34 5G ७ जुलै रोजी भारतात सादर करण्यात आला होता. या फोनची किंमत फक्त १६,९९९ रुपये आहे. फोन प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येत असून याची विक्री Amazon आणि सॅमसंगच्या अधिकृत साईटवर झाली. विशेष म्हणजे हा फोन प्राईम डे सेलमध्येच सर्वात आधी विक्रीला आला आणि याने तुफान पसंती मिळवली. याबद्दल बोलताना सॅमसंग कंपनीने सांगितले की प्राईम डे सेलमध्ये नव्याने लाँच झालेल्या फोन्समध्ये गॅलेक्सी एम ३४ नंबर १ फोन ठरला हे कंपनीचे यश आहे. दरम्यान या सेलमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन्सची विक्री २५ पट वाढली. वनप्लस नॉर्ड 3 5G, सॅमसंग गॅलक्सी M34 5G, मोटोरोला रेझर ४० सीरिज, रिअलमी नार्झो 60 सीरिज आणि iQOO Neo 7 Pro 5G या फोन्सना जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचं ही समोर आलं आहे.

या ब्रँड्सचीही झाली मोठ्या प्रमाणात विक्री
या Amazon Prime Day Sale सेलमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ब्रँडमध्ये बोट, सोनी, एलजी, सॅमसंग, फिलिप्स, विप्रो, वनप्लस, लेगो, मेबेलाइन, प्युमा, शुगर कॉस्मेटीक्स, पँपर्स या सर्वांचा समावेश होता. यामधील अधिक ब्रँड्स इलेक्ट्रॉनिक गोष्टी बनवत असल्याने मोठ्या प्रमाणात गॅजेट्सची विक्री या सेलमध्ये झाल्याचं दिसून आलं. तसंच मेकअप प्रोडक्ट्स देखी मोठ्या प्रमाणात विकले गेल्याचं दिसून आलं. कंपनीच्या माहितीनुसार ३०० कोटींहून अधिकची बचत या सेलमझ्ये प्राईम सदस्यांनी केली. यामध्ये विविध डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटची मदत प्राईम सदस्यांनी घेतली. भारतातील ४ हजाराहूंन अधिक शहरांतील प्राइम सदस्यांनी या विशेष प्राइम डे सेलमध्ये खरेदी केली.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.