Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड

7

ESIC Mumbai Bharti 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहीरातीमधील सविस्तर माहिती वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ESIC मधील ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेली पात्रता व अटींच्या चौकटीत बसत असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

सदर, पदांच्या भरतीची मुलाखत प्रक्रिया ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई : ४००१०१ या पत्त्यावर प्रत्येक आठवड्यातील बुधवारी, सकाळी ११.०० वाजता (फक्त १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत) होणार असल्याची माहितीही जाहीरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे. शिवाय, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहनही ESIC च्यावतीने करण्यात येत आहे.

(वाचा : IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत)

रिक्त जागा आणि पदांचा तपशील :

एकूण २२ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

  • Anesthesiology : ३ जागा
  • Radiology : ३ जागा
  • General Medicine : ३ जागा
  • ICU : ३ जागा
  • Pediatrics Surgery : १ जागा
  • OBGY : ३ जागा
  • Pediatrics : २ जागा
  • General Surgery : ४ जागा

वरील सर्व जागांच्या भरतीसाठी वयोमर्यादा ०१ जुलै २०२३ रोजी ४० वर्षापर्यंत असणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रता आणि वेतना विषयी :

वरील सर्व जागांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पगाराविषयी संपूर्ण माहिती अंशतः साधर्म्य असून, ESIC च्या अधिकृत जाहीरातीमध्ये याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पी.जी.पदवी / एमडी / डीएनबी किंवा समकक्ष किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा.

सदर जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्मचारी राज्य विमा महामंडळामधील या सर्व जागांच्या नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण मुंबई असणार असून, वरील जागांसाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

(वाचा : AI Free Training: केंद्र सरकारच्यावतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ट्रेनिंग; आजच करा Free रजिस्ट्रेशन)

मुलाखत कधी आणि कुठे?

ESIC मधील या २२ जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या जागांसाठीची मुलाखत १३ सप्टेंबर २०२३ पर्यत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहेत.

मुलाखतीचा पत्ता :

संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई- ४०० १०१.

उमेदवाराने अर्ज भरताना :

  • वयाचा पुरावा
  • दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी आणि इतर शैक्षणिक कागदपत्र आणि गुणपत्रिका
  • MMC/MCI रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • इंटर्नशिप प्रमाणपत्र
  • जातीचा दाखल, NCL आणि EWS प्रमाणपत्र
  • एक्सपीरिअन्स लेटर, नाहरकत प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • जाहीरातीमधील Annexure A प्रमाणे कॅपिटल (CAPITAL letters) मध्ये भरलेला Bio Data

महत्त्वाची सूचना :

  • ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने उमेदवारांनी अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

  • आठवड्यातील दर बुधवारी ही मुलाखत होणार असून यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.

  • अर्जामध्ये दिलेली कागदपत्रे, माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

  • भरतीचे इतर सर्व अधिकार ESIC (Employees’ State Insurance Corporation) मुंबईकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

(वाचा : NEET PG 2023 Counselling: मेडिकल अभ्यासक्रमांच्या समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर; २७ जुलैपासून करता येणार अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.