Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची महत्त्वपूर्ण घोषणा; काही तासांत जाहीर होणार CUET PG 2023 परीक्षेचा निकाल

6

CUET PG 2023 Result: CUET PG 2023 च्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Common University Entrance Test for Post Graduation या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत संपणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

National Testing Agency (NTA) च्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेचा निकाल आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत NTA च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाणार असल्याची माहितीही UGC चे अध्यक्ष यांनी ही माहिती दिली. हे निकाल आज रात्री किंवा उद्या सकाळी ऑनलाइन जाहीर होणार असून, उमेदवारांनी NTAच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

यावर्षी सुमारे ९ लाख उमेदवारांनी CUET UG 2023 परीक्षेसाठी नोंदणी केली होती. CUET UG चा निकाल जाहीर झाल्यापासून, PG चे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. मात्र आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत उमेदवारांची प्रतीक्षा संपणार आहे.

CUET PG स्कोअरच्या आधारे, उमेदवारांना देशातील १४२ विद्यापीठांमध्ये एमए अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर जेएनयूसह इतर विद्यापीठांमध्ये पीजी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना येथे अर्ज करता येणार आहेत.

यंदा CUET परीक्षा ५ ते ८ जून या कालावधीत घेण्यात आली होती. एनटीएने तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली होती. पहिली शिफ्ट सकाळी ८.३० ते १०.३०, दुसरी शिफ्ट दुपारी १२ ते २, तर तिसरी शिफ्ट दुपारी ३.३० ते ५.३० अशी होती. सदर परीक्षेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता परीक्षेच्या तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर येत्या काही तासांमध्ये विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

CUET PG 2023 चा निकाल पाहण्यासाठी :

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
  • तुमचा CUET PG 2023 चा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • CUET PG 2023 च्या तुमच्या निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.