Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मेडिकल अभ्यासक्रमांच्या समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर; २७ जुलैपासून करता येणार अर्ज

7

NEET PG 2023 Counselling: Medical Counselling Committee (MCC) ने NEET PG 2023 च्या समुपदेशन फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, त्इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जुलै २०२३ पासून नाव नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्याच्या पायऱ्या आणि नोंदणीच्या टप्प्यांविषयीची माहिती वैद्यकीय समुपदेशन समितीच्या (MCC) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वैद्यकीय समुपदेशन समिती जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, NEET PG समुपदेशनासाठी नोंदणी २७ जुलैपासून सुरू होणार आहेत. समुपदेशनाच्या पहिल्या यादीसाठी नोंदणी प्रक्रिया १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संपेल. तर, त्याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत उमेदवारांना या फेरीसाठी आवश्यक शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

(वाचा : NEET UG Rules: नीट युजीकडून समुपदेशन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल; कोट्यातील जागांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचे बदल)

एमसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारांकरता कॉलेज निवडीसाठी चॉईस फिलिंगचा पर्याय खुला करून दिला जाईल. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ११.५५ वाजेपर्यंत चॉईस लॉकिंगची प्रक्रिया एमसीसीच्यावतीने राबविली जाईल.

३ आणि ४ ऑगस्टला जागा वाटपाची प्रक्रिया पार पडणार असून, यासंबंधित जागावाटपाची पहिली यादी आणि याचा निकाल ५ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीत कॉलेज मिळालेल्या उमेदवारांना ६ ऑगस्ट २०२३ ला आवश्यक कागदपत्र आणि दाखले एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगइनच्या माध्यमातून करणे अनिवार्य असणार आहे. शिवाय, उमेदवारांना ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान वाटप केलेल्या कॉलेजांमध्ये आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. तर, १६ ऑगस्टपर्यंत उमेदवारांनी सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

(वाचा : MBBS Fees: राज्यात वैद्यकीय शिक्षण महागणार; मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्के वाढ)

वेळापत्रकानुसार, दुसऱ्या वाटप यादीची नोंदणी १७ ते २१ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर या फेरीसाठीची जागा वाटपाची प्रक्रिया २३ आणि २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. २५ ऑगस्टला या फेरीचा निकाल जाहीर होणार असून, २६ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तर, या दुसऱ्या फेरीत कॉलेज मिळालेल्या उयेद्वारानं २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मिळालेल्या कॉलेजांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. या समुपदेशाच्या फेरीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची ५ आणि ६ सप्टेंबरला कागदपात्रांची पडताळणी होणार आहे.

(वाचा : NExT Entrance Updates: पुढील आदेशापर्यंत नेक्स्टला स्थगिती, आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.