Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फायनली ३१ जुलैला लाँच होणार Jiobook Laptop, २० हजारांत मिळणार भन्नाट फीचर्स

9

नवी दिल्ली : लॅपटॉप सादर करत आहे. हा एक परवडणारा म्हणजेच बजेट लॅपटॉप असेल. जिओ लॅपटॉप लाँच केल्यानंतर, डेल, लेनोवो सारख्या ब्रँड्सना एक मोठं आव्हान असू शकतं. कारण रिलायन्स जिओ लॅपटॉप जिओ खूप कमी किंमतीत लाँच होऊ शकतो.

कधी होणार लाँच?

टिपस्टर अभिषेक यादवच्या मते, JioBook लॅपटॉपचा टीझर ई-कॉमर्स साइट Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लॅपटॉपच्या लाँच डेटचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. पण ते ‘युवर अल्टीमेट लर्निंग पार्टनर’ अशी टॅगलाइनसह सूचीबद्ध आहे. समोर येणाऱ्या माहितीतून JioBook लॅपटॉप ३१ जुलै रोजी लाँच केला जाऊ शकतो.

किती असेल किंंमत?
याआधी २०२२ मध्ये, JioBook लॅपटॉप भारतात २० हजांरापेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला होता. अशा स्थितीत आता या नवीन लॅपटॉपची किंमत देखील २०,००० रुपयांच्या आसपास असेल अशी अपेक्षा आहे. हा लॅपटॉप रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून देखील खरेदी करता येईल.

काय असेल खास?

JioBook लॅपटॉप कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरसह स्पष्टपणे सादर केला जाऊ शकतो. हा लॅपटॉप निळ्या रंगात येऊ शकतो. हा 4G कनेक्टिव्हिटी असलेला लॅपटॉप असेल. यामध्ये पॉवरफुल ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, लॅपटॉपमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मल्टीटास्किंग आणि नवीनतम सॉफ्टवेअर वापरता येईल.

लॅपटॉपचे फीचर्स

JioBook लॅपटॉप अत्यंत स्लिम आणि हलका असेल. त्याचे वजन सुमारे ९९० ग्रॅम असू शकते. लॅपटॉपला चांगली बॅटरी लाईफ मिळण्याची अपेक्षा आहे. यात ११.६ इंचाचा HD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. व्हिडिओ कॉलसाठी २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. लॅपटॉप Qualcomm Snapdragon 665 SoC सपोर्टसह येईल. यात 2GB रॅम आणि 32GBC स्टोरेज मिळेल. हे 128GB पर्यंत वाढवता येते. Jio लॅपटॉप JioOS वर चालतो. 5000mAh इतकी बॅटरी ऑफर केली जाऊ शकते.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.