Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाळेची ‘दांडीगुल’ न करता चिमुकलीने केलीय ५० देशांची सफर, १० व्या वर्षी मिळवलाय खास मान

9

Globetrotter Aditi Tripathi: ‘ग्लोबट्रोटर’ हा शब्द हल्ली अनेक सोशल मीडियावरील फोटोज आणि व्हिडीओजमध्ये हमखास वापरला जातो. ट्रॅव्हल ब्लॉगर्स, जगातील विविध ठिकाणांना भेट देऊन तिथल्या विविध गोष्टींची माहिती विविध फोटो, व्हिडीओ आणि आर्टिकल्सच्या माध्यमातून जातं करून ठेवतात. तर अनेकजण, जगभरातील विविध ठिकाणी फिरण्याची आपली बकेटलिस्ट पूर्ण करत भटकंती करतात. परंतु, हे सुख प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही.

प्रत्येकक्षणी घड्याळाच्या कट्ट्याबरोबर पाळणाऱ्या आणि त्याच्या टिक-टिकसोबत आपले प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या अनेकांना इच्छा असूनही हे जमत नाही. तर, अनेकदा हा खर्च खिशाला न परवडणारा असतो. पण, एका दहा वर्षांच्या अदिती त्रिपाठी जगातील तब्बल ५० देशांना भेट दिली आहे. विशेष म्हणजे, ही जगभ्रमंती करण्यासाठी तिने शाळेचा एकही दिवस बुडवला नाही. त्यामुळे सर्वात तरुण ‘ग्लोबट्रोटर (Globetrotter)’ म्हणून सोशल मिडीयावर तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.

(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)

युकेमधील लंडनच्या ग्रीनिच शहरातील (Greenwich, London, UK) मध्ये स्थायिक असणारी भारतीय कुटुंबातील आदिती सध्या सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने स्वतःच शैक्षणिक नुकसान न करता ५० देशांमधील ही सफर कशी प्लॅन केली असेल..? याबद्दल सगळ्यांना कुतूहल वाटतंय. परंतु, या चिमुरडीच्या या जगभ्रमंतीचे खरे श्रेय तिच्या आई वडिलांचे आहे. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

अदितीचे आई-वडील दीपक आणि अविलाशा यांनी आदितीच्या जन्माआधीच तिच्या या जग भ्रमंतीचे प्लॅनिंग केले होते. ‘आपल्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्यासोबत आपण विविध देशांमध्ये फिरायचे हे त्यांनी पक्के केले होते. त्यानुसार, त्यांचे प्लॅनिंगही सुरु होते. असे करताना अदितीचे शिक्षण धोक्यात येणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यायची होती; म्हणून, त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी शाळेच्या सुट्ट्या आणि बँकेच्या सुट्यांचे दिवस निवडले. अदितीच्या अभ्यासावर परिणाम न होऊ देता आणि शाळेला एकही दिवस सुट्टी न करता त्यांनी हे स्वप्न आदितीच्या दहाव्या वाढदिवसापूर्वी पूर्ण केले आहे.

फोटो सौजन्य : Facebook

आदिती, तीन वर्षांची म्हणजे नर्सरीमध्ये शिकत असताना आदितीच्या पालकांनी या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी आदिती आठवडयातून अडीज दिवस शाळेत जायची. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर दीपक आणि अविलाशा, आदितीला घेऊन प्रवासाला निघायचे आणि रविवारी रात्री उशिरा घरी परतायचे. अनेकदा, उशीर झाल्यावर सोमवारी पहाटे आदिती थेट विमानतळावरून शाळेत जायची. पण, कोणत्याही प्रकारची कारण न देता तिने स्वतःचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. “अदितीच्या प्रत्येक प्रवासातून ती अधिकाधिक समृद्ध होत गेली. तिला प्रत्येक देशातून नव्या संस्कृतीचा अनुभवही मिळाला. शिवाय, भारत, नेपाळ आणि थायलंडमध्ये नवीन संस्कृतींविषयी आदितीला कौतुक वाटते ”,अशी असल्याची प्रतिक्रिया त्रिपाठी दापंत्यानी व्यक्त केली.

आदितीने सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड यांसारख्या आशियाई देशांसह जवळजवळ संपूर्ण युरोपचा प्रवास केला आहे. अदिती आणि तिच्या साहसी पालकांनी बेन नेव्हिस, स्कॅफेल पाईक आणि स्नोडॉन, यूकेमधील तीन सर्वात उंच पर्वत देखील सर केले आहेत.

(वाचा : Career In Sports Management: खुले आहे करिअरचे विस्तीर्ण मैदान; स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी)

लेकीसाठी दरवर्षी £20,000 रुपयांचा खर्च…

आदितीच्या दहाव्या वाढदिवसापूर्वी तिला ५० देशांमध्ये नेण्यासाठी तिच्या पालकांनी खर्च प्रतिवर्षी £20,000 रुपयांचा खर्च केला आहे. आपल्या मुलीला जगभरती विविध संस्कृतींविषयी माहिती मिळावी आणि तिलाही तिथल्या विविध गोष्टींचा अनुभव घेता यावा यासाठी दीपक आणि अविलाशा या त्रिपाठी पती-पत्नीने खूप काटकसर केली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आजवर गाडी विकत घेतली नाही, शक्य असेल तेव्हा बाहेर जेवायला जाणे टाळले, अनेकदा कामाव्यतिरिक्त बाहेर येण्या-जाण्याचा खर्च कमी केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.